बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला आहे. एकुण ५८ जागांपैकी भाजपने ३६ जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली आहे. या निवडणुकीत काँग्रेसने १०, अपक्ष ८, एकीकरण समिती ४ आणि MIM एक असे उमेदवार विजयी झाले आहेत. दरम्यान, शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी मोठा विजय मिळवून भगवा फडकवण्याचा दावा केला होता.
बेळगाव महानगरपालिका निवडणुकीचा निकाल आज घोषित होत आहे. आत्तापर्यंतच्या माहितीनुसार निकालात भाजपनं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं आहे. एकहाती सत्ता काबिज करत बेळगाव महापालिकेवर कमळ फुलवलं आहे.
भाजपनं महाराष्ट्र एकीकरण समितीचा धुव्वा उडवत सत्ता काबीज केली आहे. या निवडणुकीत आत्तापर्यंत भाजपचे ३५, काँग्रेसचे १०, अपक्ष ८, महाराष्ट्र एकीकरण समिती ४ आणि एम आय एम एक अशा उमेदवारांची निर्णायक विजयी घौडदौड सुरु आहे. भाजपाला जनतेने स्पष्ट बहुमताचा कौल दिला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीला या निवडणुकीत धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला आहे. समितीचे ३२ सदस्य आधीच्या सभागृहात होते. तर कन्नड उर्दू गटाचे ३६ सदस्य होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
बेळगांवची ५८ जागेवर निवडणूक झाली असली तरी बेळगाव महापालिकेत महापौर निवडीच्या वेळी खासदार आणि आमदारांना मतदानाचा अधिकार आहे. सध्या बेळगावमध्ये भाजपचे २ खासदार २ आमदार आहेत. तर काँग्रेसचे दोन आमदार आहेत. सत्ता प्राप्त करण्यासाठी ३३ या मॅजिक फिगरची गरज असते. भाजपनं ३५ जागांवर निर्णायक आघाडी घेत निर्विवादपणे सत्ता प्राप्त केली आहे.
बेळगाव महानगरपालिका निवडणुकांसाठी ३ सप्टेंबर रोजी मतदान पार पडलं होतं. एकूण ३८५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. अपक्ष २१७ उमेदवारांचा समावेश होता.
निकाल आज घोषित झाला. या निकालात भाजपनं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं आहे. एकहाती सत्ता काबिज करत बेळगाव महापालिकेवर कमळ फुलवलं आहे. भाजपनं महाराष्ट्र एकीकरण समितीचा धुव्वा उडवत सत्ता काबीज केली आहे. भाजपाला जनतेने स्पष्ट बहुमताचा कौल देत सत्ता सोपवली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीला या निवडणुकीत धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे ३२ सदस्य आधीच्या सभागृहात होते. तर कन्नड उर्दू गटाचे ३६ सदस्य होते.