मोहोळ : ट्रकचालकाने विरुध्द दिशेस येऊन कारला धडक दिल्याने झालेल्या अपघात एक जण ठार दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बेगमपूर येथे घडली. हा अपघात इतका भीषण होता, की कारचा पुढचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.
याबाबत कामती पोलिसांकडून मिळालेली माहितीनुसार सोलापूर मंगळवेढा रोडवर एसबीआय बँक बेगमपूर समोर मालट्रक (एम एच-१३ डी कू – १२७० ) भरधाव वेगात विरुद्ध दिशेस येवुन कार (क्रमांक एम एच – १३ डी टी – १८९१) यास जोराची धडक दिली. या अपघातात सुनील बनसीध वाघमारे (वय ३१ वर्षे रा. टिळक नगर मजरेवाडी, होटगी रोड सोलापूर) हे ठार झाले तर गिरीश ब्रह्मदेव माने (वय ३२ रा. अरविंद धाम, पोलीस वसाहत, जुना पुना नाका सोलापूर) व हर्षवर्धन सर्वगोड (वय ३५ रा. गजानन नगर, मजरेवाडी, होडगी रोड सोलापूर) हे गंभीर जखमी झाले आहेत.
हा अपघात झाल्यानंतर मालट्रकचा ड्रायव्हर हा मालट्रक जागेवर सोडून पळून गेला. त्या अज्ञात ड्रायव्हरच्या विरोधात वाहन हयगयीने चालवून रस्त्याच्या विरुद्ध बाजूस येऊन धडक दिल्याने अपघातास कारणीभूत ठरलेल्या त्या ट्रक ड्रायव्हर च्या विरोधात कामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा आशयाची फिर्याद कामती पोलिसात हर्षा कुमार कांबळे यांनी दिली आहे. पुढील तपास कामती पोलिस करत आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* जड वाहतूक मार्गात बदल
सोलापूर : गोदुताई परुळेकर नगर विडी घरकुलमधून येणारी व जाणारी जडवाहतूक (अत्यावश्यक सेवेची वाहने वगळून) काही कालावधीसाठी 21 सप्टेंबर 2021 च्या मध्यरात्रीपासून पुढील आदेशापर्यंत बंद राहणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 च्या कलम 33 (1) (ब) अन्वये जड वाहतूक सकाळी 06:00 ते 13:00 व 16.00 ते 21:00 वाजेपर्यंत बंद राहील, मात्र यासाठी पर्यायी मार्ग चालू राहणार आहेत.
वळसंग पोलीस ठाणेअंतर्गत अमन चौकाला पर्यायी मार्ग साखर कारखाना-कुंभारी-अक्कलकोट सोलापूर रोड-विजय नगर, विजय नगरला पर्यायी मार्ग विजय नगर- सोलापूर अक्कलकोट रोड- कुंभारी- साखर कारखाना आणि सोलापूर अक्कलकोट रोडवरील ब्रिजखालून विडी घरकूलकडे जाणारा रोडला पर्यायी मार्ग- सोलापूर अक्कलकोट रोडने-कुंभारी-साखर कारखाना असा राहणार असल्याचे पोलीस अधीक्षक सातपुते यांनी पत्रकात नमूद केले आहे.