रायगड : रायगडमधील उरणमध्ये चायनीज खाल्याने विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. 7 जणांना विषबाधा झाली असून यामध्ये 6 मुलांचा समावेश आहे. या सगळ्यांना उलट्या आणि पोटाचा त्रास जाणवू लागला. चायनीज खाल्ल्यानेच हा त्रास झाल्याचं समोर आलं आहे. या सर्वांवर इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील डोमा येथे गेल्या महिन्यात एकाच कुटुंबातील 10 जणांना अन्नातून विषबाधा झाली होती. यात मुलगा आणि वडिलांचा मृत्यू झाला होता. मुलगा आयुष बछले (वय 7 वर्ष) याचा शुक्रवारी मृत्यू झाला, तर वडील बुधराज बछले यांचा शनिवारी (28 ऑगस्ट) सायंकाळी जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. आई लक्ष्मी बछले गंभीर अवस्थेत होते. त्यांना जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. 7 बालकांना चंद्रज्योतीच्या विषारी बिया खाल्ल्यानं विषबाधा झाली होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गाडीवरील चायनीज खाल्ल्याने 7 जणांना विषबाधा झाली. यामध्ये 6 मुलांचा समावेश आहे. या सर्वांवर इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत उरण पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
तर आता रायगडमधील बातमीविषयी माहिती, उरणमधील एन आय हायस्कूलजवळ हे चायनीज सेंटर आहे. या चायनीज सेंटरवरुन तक्रारदाराने 5 हाफ चिकन फ्राईड राईस पार्सल नेले होते. मात्र हा राईस खाल्ल्यानंतर त्रास होऊ लागला. कुटुंबातील सगळ्यांनाच उलट्या आणि पोटाचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. वेळीत दाखल न केल्यास मृत्यु ओढावला असता.
चायनीज खाल्ल्यानेच हा त्रास झाल्याचं सांगितले जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चायनीज सेंटरच्या मालकावर कारवाई करण्याची मागणी होत असून तशी तयारी पोलिसांनी केली आहे. अद्याप कोणालाही अटक केली नाही. कमी प्रतिचा भाजीपाला, चिकन वापरुन नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असल्याचाही आरोप आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने याची दखल घ्यावी अशी मागणी होत आहे. आता चायनीज गाडीवर काही खाण्यासाठी लोक धजावत नाहीत. पण कोणी एकामुळे पूर्ण चायनीज गाड्यांना दोष लावता येणार नाही. मात्र अनधिकृत, भेसळपणा, अशुद्धता ठेवणा-या गाड्यांवर कारवाईची मागणी जोर धरु लागली आहे.