नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमाद्वारे संवाद साधला. मन की बातमधून मोदींनी देशाला एक नवीन इव्हेंट दिला आहे. आज विश्व नदी दिवस असल्याचं सांगत मोदींनी हा दिवस साजरा करण्याचं सूचवलं आहे. देशाची सांस्कृतिकता आणि परंपरेचा हा दिवस आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून देशाला जोडणारा आजचा दिवस आहे, असं मोदींनी जनतेला संबोधित केलं आहे.
आजच्या रविवारचा 81वा ‘मन की बात’ कार्यक्रम झाला. त्या माध्यमातून त्यांनी देशवासीयांना संबोधित केले. आजच्या मन की बातमधून मोदींनी देशाला आणखी एक इव्हेंट दिला आहे. आज ‘विश्व नदी दिवस’ असल्याचे सांगत मोदींनी हा दिन साजरा करण्याचे सूचवले आहे.
सध्याची तरुणाई दररोज कुठला ना कुठला दिवस साजरा करते. वाढदिवसापासून ते टी डे, मनी डे, हनी डे, असे एकापेक्षा ‘एक डे’ आपण साजरे करतो. गुगलवर सर्च केल्यानंतर वर्षभरातील 365 दिवसांच्या ‘डे’चं कॅलेंडर तुम्हाला पाहायला मिळेल.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मात्र, आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. देशाची सांस्कृतिकता आणि परंपरेचा हा दिवस आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून देशाला जोडणारा आजचा दिवस आहे. आज विश्व नदी दिवस आहे, अशी आठवण मोदींनी आपल्या आजच्या ‘मन की बात’ कार्यक्रमातून करुन दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मनकी बातमधून विश्व नदी दिवस साजरा करण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळू शकतो. सध्या या आवाहनाचे स्वागत केले जात आहे.
आपण सर्वांनी दरवर्षी एक दिवस नदी दिवस साजरा केलाच पाहिजे, कारण लहान – सहान घटनांमधून मोठी क्रांती होते. महात्मा गांधींनीही लहान-लहान प्रयोगातून मोठं काम केल्याचंही मोदींनी म्हटलं. नदी आपल्यासाठी भौतिक वस्तू नसून जिवंत साधनसंपत्ती आहे. म्हणूनच आपण नदीला आपली माता मानतो, आपले कितीही उत्सव, सण, पंरपरा आणि उमंग हे सर्व या मांतांच्या कुशीतच साजरे होतात.
गुजरातमध्ये पहिला पाऊस झाल्यानंतर जल-जलिनी एकादशी साजरी करण्यात येते. तसेच, बिहार आणि पूर्वेकडील भागात छठपूजा आयोजित केली जाते. त्यासाठी, किनाऱ्यांची स्वच्छता करण्यात आली असेल, असे म्हणत प्रदुषणमुक्त नद्यांवरही मोदींनी मन की बात केली.
अधिक माहिती घेतली असता जागतिक नदी दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव ब्रिटीश जलतज्ज्ञ मार्क अँजेलो यांनी संयुक्त राष्ट्रसंघात मांडला. त्यांनी ब्रिटिश कोलंबियामधल्या अनेक नद्या स्वच्छ आणि सुडौल केल्या. त्यांचे एक वाक्य लक्षात राहिले, ”कोणतीही नदी वाचवण्याच्या पलीकडे गेलेली नाही.” संयुक्त राष्ट्राच्या या निर्णयानुसार 2005 मध्ये जगातील 60 देशांनी जागतिक नदी दिवस साजरा केला. या वर्षी हा दिवस 27 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येत आहे.