नवी दिल्ली : साडी हा भारतातील पारंपरिक पेहराव सातासमुद्रापार विदेशातही पोहोचला आहे. साडी हा पेहेराव स्मार्ट ड्रेस नाही असं एका हॉटेलने म्हटलं होतं. या हॉटेलमधील एका स्टाफने साडी नेसून आलेल्या एका महिलेला हॉटेलमध्ये एन्ट्री देण्यास नकार दिला होता. साडी हा स्मार्ट पेहेराव, स्मार्ट ड्रेस नसल्याचं सांगत हॉटेल स्टाफने महिलेला एन्ट्री दिली नव्हती. आता याच रेस्टॉरंटवर महापालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे. हे हॉटेल विना परवाना चालत होतं. या माहितीनंतर प्रशानसाकडून नोटिस जारी करण्यात आली.
दिल्लीतील अक्वाईल नावाच्या रेस्टॉरंटमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या व्हिडीओद्वारे असे समोर आले होते की, यातील एका महिलेने साडी नेसल्यामुळे तिला रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकारला होता. भारतीय संस्कृतीत पारंपारीक साडीला खूप महत्व आहे. मात्र साडी नेसल्यामुळे प्रवेश नाकारल्याने याबाबत सध्या सोशल मिडीयावर संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर आता या रेस्टॉरंटवर कारवाई करुन हॉटेल बंद करण्यात आलं आहे.
21 सप्टेंबर रोजी परिसरातील सार्वजनिक आरोग्य निरीक्षकांना आढळलं, की रेस्टॉरंट परवान्याशिवाय, अस्वच्छ स्थितीत चालत होतं. एवढंच नाही, तर रेस्टॉरंटने सार्वजनिक जमिनीवर बेकायदेशीर कब्जा केला होता.
24 डिसेंबर रोजी रेस्टॉरंट बंद करण्याची नोटिस पाठवण्यात आली होती. 48 तासात रेस्टॉरंट बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर आता या रेस्टॉरंटला टाळं लागलं आहे. काय आहे प्रकरण? दक्षिण दिल्लीतील एका अक्वाईल नावाच्या रेस्टॉरंटमध्ये हा प्रकार उघडकीस आला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मागील आठवड्यात एका फेसबुक पोस्टमध्ये एका महिलेने संपूर्ण घटनेबाबत खुलासा केला होता. साडी नेसल्यामुळे महिलेला हॉटेलमध्ये प्रवेश दिला नाही. यावरुन हॉटेल स्टाफशी झालेल्या भांडणाचा व्हिडीओही महिलेने पोस्ट केला होता. व्हिडीओमध्ये एक कर्मचारी साडी स्मार्ट ड्रेस नसल्याचं म्हणत असल्याचं समोर आलं. यावर हॉटेलकडून महिलेनेच कर्माचाऱ्यांशी वाद घातल्याचं म्हटलं आहे. त्या महिलेच्या नावावर रिजर्वेशन नसल्याचं सांगण्यात आलं, जेणेकरुन महिला येथून निघून जाईल आणि परिस्थिती संभाळता येईल, असं हॉटेलकडून सांगण्यात आलं.
या रेस्टॉरंटवर महापालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे. हे हॉटेल विना परवाना असल्याने प्रशानसाकडून नोटिस जारी करण्यात आली आहे. दक्षिण दिल्ली महानगरपालिकेचे महापौर मुकेश सूर्यन यांनी कारवाईबाबतची माहिती दिली.21 सप्टेंबर रोजी परिसरातील सार्वजनिक आरोग्य निरीक्षकांना आढळलं, की रेस्टॉरंट परवान्याशिवाय, अस्वच्छ स्थितीत चालत होते आणि या रेस्टॉरंटने सार्वजनिक जमिनीवर बेकायदेशीर कब्जा केला असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. यामुळे रेस्टॉरंटवर कारवाई केली आहे.
दरम्यान, व्हायरल व्हिडीओमध्ये साडी परिधान केल्यामुळं महिलेल्या रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकरण्यात आला. त्यावरुन महिला आणि रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्यांमध्ये वादही होत असल्याचं दिसत आहे. शेफाली यांनी व्हिडीओ पोस्ट करत लिहिलं की, हे कोणी ठरवलं की, साडी ‘स्मार्ट वेअर’ नाही? मी यूएस, यूएई सोबतच यूकेमधील सर्वात उत्तम रेस्टॉरंटमध्ये साडी नेसून गेले होते. तिथे मला कोणीच थांबवलं नाही आणि हे रेस्टॉरंट भारतात एक ड्रेस कोड ठरवतंय आणि स्वतःच ठरवतंय की, साडी ‘स्मार्ट वेअर’ नाही? हे विचित्र आहे, असे त्या महिलेला सांगण्यात आले होते.