पुणे : मराठीतले विनोदी लेखक व कथाकथनकार दत्ताराम मारुती मिरासदार यांचे आज निधन झाले आहे. ज्येष्ठ साहित्यिक द.मा. मिरासदार यांचं निधन झालं आहे. पुण्यातील राहत्या घरी मिरासदार यांनी वयाच्या ९५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
त्यांचा जन्म १४ एप्रिल, १९२७ मध्ये झाला होता. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वृध्दापकाळानं त्यांच निधन झालं आहे. द. मा. मिरासदार यांना साहित्य अकादमी पुरस्काराबरोबरच महाराष्ट्र राज्याचा वाङ्मयीन पुरस्कारही मिळाला होता. त्याचबरोबर अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे. राज्य पुरस्कार, गदिमा पुरस्कार, अत्रे पुरस्कार, अश्या अनेक पुरस्कारांनी त्यांना यापूर्वी गौरविण्यात आले होते.
त्यांचे शिक्षण अकलूज, पंढरपूर येथे झाले. पुण्यात आल्यावर ते एम्.ए. झाले. काही वर्षे पत्रकारी केल्यानंतर त्यांनी इ. स. १९५२ साली अध्यापनक्षेत्रात प्रवेश केला. पुण्याच्या कॅंप एज्युकेशनच्या शाळेत ते शिक्षक होते. १९६१ मध्ये ते मराठीचे प्राध्यापक झाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मराठीतील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी, चिं.वि. जोशी, आचार्य अत्रे, पु.ल. देशपांडे यांनी जोपासलेली विनोदा लेखनाची परंपरा द. मा. मिरासदारांनी पुढे सुरू ठेवली. मिरासदारांच्या व्यंकूची शिकवणी, माझ्या बापाची पेंड, शिवाजीचे हस्ताक्षर, भुताचा जन्म, माझी पहिली चोरी, हरवल्याचा शोध इत्यादी कथा उत्कृष्ट लिखाण आणि त्याचे इत्तम सादरीकरण यामुळे वाचकांच्या आणि श्रोत्यांच्या मनात कायमच्या कोरल्या गेल्या आहेत. गप्पागोष्टी, गुदगुल्या, मिरासदारी, गप्पांगण, ताजवा, असे २४ कथासंग्रह, १८ विनोदी चित्रपटांच्या पटकथा त्यांच्या नावावर आहेत
व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील आणि द. मा. मिरासदार या त्रिकुटाचं कथाकथन मराठी जनांसाठी आवडीचं केंद्र असायचं. द.मा. मिरासदार यांचं कथाकथन संपूर्ण महाराष्ट्राभर तर होतंच असायचं. परंतु महाराष्ट्राबाहेर आणि परदेशातही द.मा. मिरासदार यांनी कथाकथन केलं आहे. पुण्यातील सहकार नगर मधील राहत्या घरी आज द.मा मिरासदार यांनी वृद्धापकाळाने अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ९५व्या वर्षी मिरासदार यांचं निधन झालं.
मराठी साहित्य क्षेत्रातील कादंबरी, विनोदी कथा, वगनाटय, चित्रपट संवाद, विविध विषयांवर लेख इत्यादी सर्व साहित्य प्रकार प्रा. मिरासदार यांनी लीलया हाताळले आहे. राज्य पुरस्कार, गदिमा पुरस्कार, अत्रे पुरस्कार, अश्या अनेक पुरस्कारांनी त्यांना यापूर्वी गौरविण्यात आले होते.