मुंबई : शाहरुख खानचा पुत्र आर्यन खान याला ड्रग्स प्रकरणात NCB ने अटक केली. यानंतर बॉलिवूड अभिनेता सलमान खानने शाहरुख खानची भेट घेतली. यावेळी त्याने शाहरुखला धीर देण्याचा प्रयत्न केला. काल (रविवार) रात्री जवळपास 11.30 वाजता सलमान खान शाहरुखच्या घरी पोहोचला. या दरम्यानचे अनेक फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या मुलाचे नावही मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर जाणाऱ्या रेव्ह पार्टीमध्ये समोर आले आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आर्यन खानची चौकशी केली. त्यानंतर आता सर्व वस्तुस्थिती लक्षात घेऊन एनसीबीने या प्रकरणात आर्यन खानला अटक केली आहे. तसेच इतर 8 जणांनाही अटक करण्यात आली आहे.
आर्यनला ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी एक दिवसाची कोठवडी सुनावण्यात आलीय. त्यामुळे त्याची आजची रात्र ही पोलीस कोठडीत जाईल. याच पार्श्वभूमीवर अभिनेता सलमान खाननं रात्री शाहरुखच्या घरी भेट दिली. शाहरुख खानचा मन्नत नावाचा बंगला मुंबईतल्या बँडस्टँड भागात आहे. त्याच घरी सलमाननं भेट दिलीय.
विशेष म्हणजे शाहरुख आणि सलमान यांच्यात फारसं जमून नसल्याच्या बातम्या अनेक वेळेस माध्यमात आलेल्या आहेत. पण सलमान खानच्या कालच्या कृतीनं दोन्ही खान एकत्र आल्याचं दिसतंय. आर्यन खान हा शाहरुखचा मोठा मुलगा असून सुहाना आणि अबराम अशी इतर दोन मुलं त्यांना आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यातला आर्यन खानला क्रूझवर ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आलीय. त्याला दुपारनंतर कोर्टासमोर हजर केलं गेलं. नंतर त्याला एक दिवसाची कोठडीही सुनावण्यात आली.
सलमान खान काल रात्री दहाच्यानंतर शाहरुखच्या ‘मन्नत’ ह्या बंगल्यावर दाखल झाला. अर्थातच सकाळपासूनच शाहरुखच्या घराबाहेर माध्यमकर्मींनी गर्दी केलीय. त्यामुळे शाहरुखच्या घरातून कोण बाहेर पडतंय, कोण आत जातंय यावर कॅमेऱ्यांचं बारीक लक्ष आहे. सलमान खान रात्री आला त्यावेळेस तो येत असल्याची कुणकुण पत्रकारांना लागलेलीच होती. त्यामुळे तो येताच कॅमेऱ्यांनी एकच गराडा घातला.
दिल्लीच्या एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने तीन दिवसांच्या क्रूझ टूरचं आयोजन केलं होतं. हे क्रूझ शनिवारी (2 सप्टेंबर) संध्याकाळी मुंबईहून गोव्याच्या दिशेला निघणार होतं. विशेष म्हणजे क्रूझमध्ये तीन दिवसांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आणि पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. हे क्रूझ तीन दिवसांनी पुन्हा मुंबईत येणार होतं. याच क्रूझमध्ये आर्यन खान आणि त्याचे मित्र गेले होते. या क्रूझच्या या पार्टीची इन्स्टाग्रामवरही जाहिरात करण्यात आली होती.
क्रूझने प्रवास करण्यासाठी आणि तिथल्या कार्यक्रमांचा आस्वाद घेण्यासाठी प्रत्येकी 80 हजार रुपये तिकीट होतं, अशी माहिती समोर आली आहे. याच क्रूझमध्ये आयोजित पार्टीत ड्रग्जचं सेवन केलं जाणार असल्याची माहिती एनसीबी अधिकाऱ्यांना गुप्त बातमीदारांकडून मिळाली. त्यानंतर कारवाई करत एनसीबीने आर्यन खानला अटक केली. सध्या त्याला एका दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे.