नवी दिल्ली : आयसीसी टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात 24 ऑक्टोबरला सामना होणार आहे. सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये 70 टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच 3 ऑक्टोबरपासून तिकिटांची विक्री सुरु झाली आहे. या सामन्यासाठी सर्वात महाग तिकिटाचा दर हा 2 लाख रुपये इतका आहे. सामान्य तिकिटापेक्षा 333 टक्के अधिक किंमत आहे. तिकिटाची सुरुवात 12,500 पासून आहे. तर स्वस्त तिकीट 600 रूपये आहे.
आयसीसी आणि स्पर्धेचे यजमान बीसीसीआयने स्टेडियममध्ये 70 टक्के प्रेक्षकांच्या प्रवेशाला ग्रीन सिग्नल दिला आहे. याचा अर्थ असा की, टी -20 विश्वचषकाचे सामने शांततेत, प्रेक्षकांविना खेळवले जाणार नाहीत, तर स्टेडियममध्ये प्रेक्षकांचा जल्लोष पाहायला मिळणार नाही. क्रिकेटचे वेड असलेल्या भारतीय आणि पाकिस्तानी चाहत्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे, यूएई आणि ओमान येथे होणाऱ्या आयसीसी टी – 20 विश्वचषकातील सामन्यांच्या तिकिटांची विक्री कालपासून सुरु करण्यात आली होती. दरम्यान, अशी माहिती समोर आली आहे की, तिकीटविक्रीसाठी विंडो ओपन होताच अवघ्या तासाभरात सर्व तिकीटं विकली गेली आहेत. 24 ऑक्टोबर रोजी खेळवल्या जाणाऱ्या सामन्याबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. ही तिकीटविक्री त्याचं प्रमाण आहे.
आयसीसीने 3 ऑक्टोबरपासून तिकिटांची विक्री सुरु केली आहे. सर्वात स्वस्त तिकीट दर हा 600 रुपये इतका आहे. मात्र भारत विरूद्ध पाकिस्तान या हायवोल्टेज सामन्यासाठी क्रिकेटप्रेमी एका तिकिटासाठी लाखो रुपये मोजत आहेत. तिकीट 333 टक्के अधिक महाग विकलं जात आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या सामन्यासाठी सर्वात महाग तिकिटाचा दर हा २ लाख रुपये इतका आहे. सामान्य तिकिटापेक्षा 333 टक्के अधिक किमत आहे. वेगवेगळ्या स्टँडसाठी वेगवेगळी किमत आहे. तिकिटाची सुरुवात 12,500 पासून आहे. या व्यतिरिक्त 31,200 आणि 54,100 रुपयात क्रिकेटप्रेमी प्रीमियम आणि प्लॅटिनम स्टँडचं तिकीट खरेदी करू शकतात. या तिन्ही कॅटेगरीचे तिकिटं जवळपास संपली आहेत. स्काय बॉक्स आणि वीआयपी स्वीटच्या किमती अधिकृत वेबसाईटवर दिसत नाहीत. मात्र भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या 31 ऑक्टोबरच्या सामन्यासाठी वीआयपी स्वीटची किमत 1 लाख 96 हजार रुपये आहे. हा दर पाहता भारत-पाकिस्तान सामन्याचे तिकीट दर महाग असण्याची शक्यता आहे. कारण भारत-न्यूझीलंड सामन्यासाठी सर्वात कमी दर असलेलं तिकीट 10,400 रुपये आहे.
दुबईच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान आमनेसामने असतील. या सामन्यासह, दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी या स्पर्धेतीत त्यांच्या मोहिमेची सुरुवात करतील. विश्वचषकासारख्या मोठ्या मंचावर, भारताचा संघ आजपर्यंत पाकिस्तानकडून कधीही हरला नाही आणि त्यांचा तोच विक्रम कायम राखण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरेल. टी – 20 कर्णधार म्हणून टीम इंडियासाठी विराट कोहलीची ही शेवटची स्पर्धा असेल. म्हणूनच, त्याने आणि टीम इंडियाने पाकिस्तानला पुन्हा एकदा धूळ चारण्यासाठी तयारी सुरु केली आहे.
भारत-पाकिस्तानमधील क्रिकेटच्या मैदानावरील महाभारताला सर्व सामन्यांपेक्षा विशेष मानलं जातं. चाहतेदेखील यासाठी खूप उत्सुक असतात. त्यांच्या उत्सुकतेचा यापेक्षा चांगला पुरावा काय असू शकतो की, आता वेबसाइटवर या सामन्याच्या तिकिटांचा दुष्काळ आहे. तिकिटांची विक्री सुरू होताच चाहत्यांमध्ये ती खरेदी करण्याची स्पर्धाच पाहायला मिळत होती. अवघ्या तासाभरात सर्व तिकिटे विकली गेली.
ही माहिती शेअर करताना आयसीसीने म्हटले आहे की यूएई आणि ओमानमध्ये होणाऱ्या टी – 20 विश्वचषकासाठी स्टेडियममध्ये 70 टक्के प्रेक्षकांना परवानगी असेल. यासह, तिकिटांची ऑनलाइन विक्री सुरू झाली आहे. आयसीसीच्या या मेगा इव्हेंटमध्ये सुपर 12 स्टेजचा पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी खेळवला जाईल. तर या स्पर्धेतील सर्वात हायप्रोफाईल सामना 24 ऑक्टोबर रोजी होणार आहे, ज्यामध्ये दोन कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान एकमेकांसमोर उभे असतील.