बार्शी – पैशाच्या वादातून पोटच्या मुलाने जन्मदात्या आईचा डोक्यात दगड घालून खून करून तिचा मृतदेह प्लॅस्टीकमध्ये गुंडाळून घराजवळील झुडपात टाकून दिला. हि घटना वाणी प्लॉट भागात घडली आहे. खून केल्यानंतर मुलगा मुंबईला पळून गेला आहे.
रुक्मिणी नागनाथ फावडे (वय 45 रा. वाणी बार्शी) असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे. श्रीराम नागनाथ फावडे (वय 21) असे खून केलेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी मुलाविरोधात बार्शी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी मुलाचे घरात पैशावरुन नेहमी वाद होत होते. मृत महीला रुक्मिणी व तिचा मोठा मुलगा श्रीराम हे दोघेजण घरात नेहमी भांडण होत असल्याने वेगळे राहत होते.
आई रुक्मिणी व मोठा मुलगा श्रीराम हे दोघेजण वाणी प्लॉट मधील विवेक शिंदे यांच्या घरात राहत होते. या दोघा मायलेकरात पैशावरून वाद होत असे.
याबाबत मागे एकदा पोलीसातही तक्रार दाखल होती. या वादातून मुलगा श्रीराम याने आईच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केला. व मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो प्लॅस्टीमध्ये गुंडाळून घराजवळील झुडपात टाकला. काल मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. खूनानंतर मुलगा मुंबईला पळून गेल्याच स्पष्ट झालं आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, त्यांचा मोठा मुलगा श्रीराम हा सध्या मुंबई येथे गेल्याचे त्याच्या मोबाईल स्टेटस वरुन समजले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच घरातील सर्व वापरण्याचे कपडे त्याने नेल्याचे लक्षात आले. यापूर्वीही त्याने आईस व भावास मारहाण केली होती. त्यामुळे त्यानेच आईचा डोक्यात दगड घालून जिवे ठार मारले, असा संशय आहे. पोलिस पुढिल तपास करत आहेत.
* महिलेच तोंड दाबून आळजापूरात जबरी चोरी
बार्शी – मध्यरात्री घरात घुसलेल्या दोन चोरट्यांनी महिलेच्या तोंडाला रुमाल लावून गळ्यातील दिड तोळ्याचे सोन्याचे गंठण, घरात कपाटात ठेवलेली ५० हजाराची रोकड व दागिने असा १ लाख ४ हजाराचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
हि घटना बार्शी तालुक्यातील आळजापूर गावात काल मध्यरात्री घडली. प्रविण एकनाथ उंबरे यांनी याबाबत पोलीसात फिर्याद दिली आहे. उंबरे यांच्या घरात दोन चोरटे तोंडाला मास्क लावून घुसले. घरात शिरताच त्यांनी फिर्यादी उंबरे यांच्या पत्नी राधा यांच्या तोंडात रुमाल घालून
त्यांना धरुन त्यांच्या गळ्यातील मंगळसुत्र काढून घेतलं व दमदाटी करुन कपाटातील रोकड व दागिने असा १ लाख ४ हजाराचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला. वैराग पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.