मुंबई : राज्यात सध्या पाचवी ते बारावीच्या शाळा सुरू आहेत. त्यातच आता पहिली ते चौथीच्या शाळा दिवाळीनंतर राष्ट्रीय शिक्षण दिनाचे औचित्य साधून 11 नोव्हेंबरपासून सुरू करण्याच्या दृष्टीने कृती आराखडा तयार केला जात असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. सध्या सुरू असलेल्या माध्यमिक शाळा व त्यातील विद्यार्थ्यांचा आढावा घेऊन शासन स्तरावरुन त्यासंबंधीचा अंतिम निर्णय काही दिवसांत होईल, असं सांगण्यात आलं.
यासंदर्भात प्राथमिक शाळांच्या स्वच्छता करण्याच्या सूचना वरिष्ठ स्तरावरून देण्यात आलेल्या आहेत.
गेली दीड वर्षे शाळा बंद असल्याने मुलांच्या शैक्षणिक स्तरावर विपरीत परिणाम होत असून ऑफलाइन शिक्षण देण्यात अडचणी असल्याने आणि राज्यातील पाच जिल्हे वगळता इतर जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट असल्याने शासनाने हा निर्णय घेतला आहे.
राज्यातील मुंबई, पुणे, सोलापूर, सातारा, नगर जिल्हा अजूनही कोरोनाच्या प्रादुर्भावाखाली आहेत. मात्र अन्य जिल्ह्यातील कोरोना ची लाट आता बऱ्यापैकी ओसरली आहे. अशा परिस्थितीत मुलांचे नुकसान होऊ नये याकरिता राज्य शासनाने माध्यमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय अगोदर घेतला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या शाळांमधील एकूण कामकाज लक्षात घेऊन सरकारने आता 11 नोव्हेंबर रोजी चा मुहूर्त प्राथमिक शाळांसाठी जाहीर केला आहे. अर्थात या संदर्भातील शासन नियमावली जाहीर झालेली नाही.
कोरोनावरील प्रतिबंधित लस टोचण्याची मोहीम जोरदार सुरू असल्याने मृत्यूचे प्रमाणदेखील कमी झाले आहे. मुंबई महापालिका, नगर, पुणे, सोलापूर व सातारा हे जिल्हे वगळता उर्वरित जिल्ह्यांमधील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे. दरम्यान, सध्या शहरातील आठवी ते बारावीचे तर ग्रामीणमधील पाचवी ते बारावीच्या ऑफलाइन शाळा सुरू आहेत.
दरम्यान, सध्या शहरातील आठवी ते बारावीचे तर ग्रामीणमधील पाचवी ते बारावीच्या ऑफलाईन शाळा सुरू आहेत. राज्यातील जवळपास ४५ हजार शाळा सुरू झाल्या असून ६५ लाखांपर्यंत विद्यार्थी शाळेत दररोज हजेरी लावत आहेत. कोरोनासंबंधीच्या नियमांचे तंतोतंत पालन करून शाळा सुरू आहेत. दुसरीकडे पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सध्या सुरू नाहीत.
तरीही, कोरोनाचे नियम पाळून शहर-ग्रामीणमधील लाखो विद्यार्थ्यांना विशेषत: ज्यांच्याकडे ॲन्ड्रॉईड मोबाइल नाहीत त्यांना ऑफलाईन पध्दतीने शिक्षण दिले जात आहे. त्याच धर्तीवर आता पहिली ते चौथीचे वर्ग सुरू केले जाणार आहेत. दुसरीकडे शहरातील शाळांवरील निर्बंध शिथिल करून कोरोनामुक्त प्रभागांमधील सर्वच शाळा सुरू होतील, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले.