जेरुसलेम : इस्रायलच्या खोल समुद्रात 900 वर्ष जुनी तलवार सापडली आहे. एका स्कुबा डायव्हिंग करणाऱ्या श्लोमी काटझीनने ही प्राचीन तलवार शोधली आहे. दरम्यान, ही ऐतिहासिक तलवार धर्मयुद्धावेळी लढणाऱ्या एखाद्या सैनिकाची असेल आणि काही कारणास्तव ही तलवार समुद्रात पडली असावी, असं म्हटले जात आहे. समुद्रात जवळपास 200 मीटर खोल ही तलवार सापडली. त्यावर अनेक गोष्टींचे अवशेष आहेत. समुद्रात खोल जावून पानबुड्याला स्कूबा डायव्हिंग करणाऱ्या पाणबुड्यांना ही तलवार सापडली आहे.
ज्या व्यक्तीला ही तलवार सापडली त्याने ती सरकार जमा केली आहे. ही तलवार अंदाजे 900 वर्षे जूनी असावी असा तज्ञांचा अंदाज आहे. या तलवारीवर शेवाळे चढलेले होते. त्यामुळे या तलवारीची धार कमी झाली आहे. लोखंडाची तलवार असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते.
एका स्कुबा डायव्हिंग करणाऱ्या व्यक्तीने ही प्राचीन तलवार शोधली आहे. ही ऐतिहासिक तलवार धर्मयुद्धावेळी लढणाऱ्या एखाद्या सैनिकाची असेल आणि काही कारणास्तव ही तलवार समुद्रात पडली असावी, असे म्हटले जात आहे. याठिकाणी अनेक पुरात वस्तू सापडत असतात. त्यातील काही वस्तू 4 हजार वर्षांपूर्वीच्याही असतात. मात्र या ठिकाणची वाळू सातत्याने वर खाली होत असते, त्यामुळे तेथील जमिनीची खोली सतत कमी जास्त होत असते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
एका रिपोर्टनुसार, श्लोमी काटझिन नावाची व्यक्ती समुद्र किनाऱ्यावर स्कुबा डायव्हिंग करत होती. त्यावेळी जवळपास 200 मीटर खोल समुद्रात गेल्यानंतर एक विचित्र वस्तू दिसली. त्यानंतर श्लोमी काटझिन यांनी जवळ जाऊन पाहिले, तेव्हा त्यांना समजले की, ती तलवार आहे. तलवार खूप जुनी होती. त्यावर अनेक गोष्टींचे अवशेष होते. अनेक जूनी भांडी आणि एक मीटर लांब तलवारीचाही समावेश असल्याचे इस्रायलच्या पुरातन विभागाने सांगितले आहे.
असे सांगितले जात आहे की, पाण्यात पोहायला गेलेला हा माणूस समुद्रकिनाऱ्यापासून 150 मीटर अंतरावर आणि 5 मीटर खोल पाण्यामध्ये पोहत होता. ही जागा पूर्वीच्या काळी जहाजांना नांगर टाकून थांबण्यासाठी राखीव होती.
एका बातामीनुसार श्लोमी काटझिन यांनी ही तलवार समुद्रातून बाहेर काढली. त्यानंतर ही तलवार इस्रायल पुरातन प्राधिकरणाकडे दिली. यावेळी त्यांना सांगण्यात आले की, ही तलवार एका क्रुसेडरची होती आणि ती सुमारे 900 वर्षे जुनी आहे. तर इस्रायल पुरातन प्राधिकरणाचे रॉबरी प्रिव्हेंशन युनिट इंस्पेक्टर निर डिस्टेलफेल्ड म्हणाले की, “या तलवारीचे योग्य त्या स्थितीत जतन करण्यात आले आहे. एक सुंदर आणि दुर्मिळ शोध आहे आणि वरवर पाहता ही तलवार क्रुसेडर नाइटची होती.”
दरम्यान, पुरातत्त्व अधिकाऱ्यांनी सांगितले की, या तलवारीचे एक मीटर लांब ब्लेड आणि 30 सेमी हँडल आहे. पुरातत्त्व अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, ही तलवार एका योद्ध्याची आहे, जो धार्मिक युद्धादरम्यान लढला होता. त्यावेळी अशा योद्ध्यांना क्रुसेडर म्हटले जात होते. आता ही तलवार साफ करून अभ्यास केला जात आहे.