मोहोळ : मोहोळ येथे नव्यानेच रुजू झालेले तहसीलदार प्रशांत बेडसे यांचा मंगळवारी (ता. २६) शेतकरी संघटनेने पुतळा जाळला आहे. अपमानास्पद वागणूक दिल्याच्या निषेधार्थ पुतळा जाळण्यात आला आहे. शेतकरी संघटनेने जिल्हाधिका-यांनाही निवेदन दिले आहे.
तहसीलदारांकडून सर्वसामान्य नागरिकांना राजकीय व सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देणे व धमकीची भाषा वापरणे यामुळे महसूल प्रशासन बदनाम होत आहे. अशा बेजबाबदार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जनहित शेतकरी संघटनेने केली आहे. तसे निवेदनही कार्यकर्त्यांनी २६ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयास दिले आहे.
दरम्यान, २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी जनहित शेतकरी संघटनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी मोहोळच्या शिवाजी चौकात तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले.याबाबत जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मोहोळचे तहसीलदार यांना शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भैय्यासाहेब देशमुख हे सार्वजनिक व सामाजिक हिताचे निवेदन देण्यासाठी गेले असता त्यांना अपमानास्पद व अरेरावीची भाषा केली तसेच तुमचे निवेदन माझ्याकडे न देता ते नायब तहसीलदार यांच्याकडे द्या, असे म्हटले. अशी अपमानास्पद वागणूक देणाऱ्या अधिकाऱ्याचा निषेध व्यक्त करत त्यांची तात्काळ चौकशी करून निलंबन करण्यात यावे, अशी मागणी केली.
अन्यथा ८ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या परिणामास संबंधित अधिकारी जबाबदार राहतील, अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनावर श्रीकांत नलवडे, सुरेश बापू नवले,जिल्हा उपाध्यक्ष महेश बिस्किटे, सुभाष शेंडगे, प्रवीण गायकवाड आदींच्या सह्या आहेत.
“त्यांनी मास्क घातला नाही म्हणून त्यांना विचारणा केली, त्यामुळे त्याना राग आला असेल त्यामुळे त्यानी हे कृत्य केलेले असू शकते. त्यांनी पुतळा जाळला किंवा नाही याबाबत मला माहिती नाही”
– प्रशांत बेडसे
तहसीलदार – मोहोळ
* सोलापूर जिल्हाचा जलजीवन मिशनचा २०१ कोटीचा आराखडा
सोलापूर – जिल्ह्यात जलजीवन मिशन योजना प्रभावीपणे राबवा. लोकांना वेळेत पाणी द्या सोलापूर जिल्ह्यासाठी २०१ कोटी रूपयाचा आराखडा करण्यात आला असल्याची माहिती राज्य पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे प्रकल्प संचालक रविंद्र शिंदे यांनी दिली.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज जलजीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन ग्रामीण, भुजल सर्वेक्षण व पाणी गुणवत्ता विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे बैठकीचे आयोजन करणेत आले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दिपक कोळी, विभागीय समन्वयक चंद्रकांत कचरे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, भुजल सर्वेक्षण विभागाचे मुश्ताक शेख, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, गटविकास अधिकारी संताजी पाटील, गटविकास अधिकारी गणेश मोरे, गटविकास अधिकारी देशमुख प्रमुख उपस्थित होते.
– जलजीवन मिशन लोकांचा प्राण – संचालक रविंद्र शिंदे
जलजीवन मिशन ही महत्वकांक्षी योजना आहे. १० टक्के लोकवर्गणी साठी लोकांमध्ये जागृती करा. पाणी पुरवठा योजना लोकांना आपली वाटली पाहिजे. लोकांचा सहभाग महत्वाचा आहे. वैयक्तीक नळ कनेक्शन पुर्ण करा.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन ची कामे वेळेत पुर्ण करा. सर्व कुटूंबाना वैयक्तीक शौचालयाचा लाभ द्या. ओडीएफ प्लस गावे करून शास्वत स्वच्छता ठेवणे साठी प्रयत्न करा. जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन च्या कामासाठी मनुष्य बळ देणेत येत आहे. हात धुणेची सोय शाळेत व अंगणवाडीत करा. शाळा व अंगणवाडीला नळ कनेक्शन द्या असेही त्यांनी सांगितले.
– प्रत्येक गावांसाठी सार्वजनिक शौचालय – सिईओ दिलीप स्वामी
एकही व्यक्ती शौचालयासाठी उघड्यावर जाणार नाही याची काळजी घ्या. प्रत्येक गावांसाठी सार्वजनिक शौचालय उभारणेत येणार आहे. गटविकास अधिकारी यांना सार्वजनिक शौचालय मान्यतेचे अधिकार देणेत आले आहेत. सर्व कुटुंबांना शौचालय होणे साठी प्रयत्न करी असे आवाहन सिईओ दिलीप स्वामी यांनी केले.
या वर्षातील कामे डिसेंबर पर्यंत पुर्ण न झाले कारवाईला तयार रहा, असेही ठामपणे त्यांनी सांगितले. जलजीवन मिशन चे कामात कुचराई झालेली खपवून घेणार नाही असेही स्पष्ट पणे त्यांनी सांगितले. जिल्ह्याची मान खाली घालायला लावू नका.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी सांडपाणी व घन कचरा व्यवस्थाप न मध्ये रोजगार हमी योजनेचा कृती संगम करणेचे सुचना दिल्या. उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांनी १५ वा वित्त आयोगा मध्ये जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन साठी तरतुद करून ठेवा. अशा सुचना दिल्या.
उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी वैयक्तीक शौचालया साठी आधारकार्ड पाठविणेचे आवाहन केले. या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.