ओटावा : भारतीय वंशाची महिला कॅनडाची संरक्षण मंत्री झाली आहे. अनिता आनंद यांच्यावर देशाच्या संरक्षण खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अनिता आनंद यांच्या आधीही भारतीय वंशाचे हरजीत सज्जन हे संरक्षण मंत्री होते. लष्करातील प्रमुख सुधारणांवर अनिता आनंद यांचा भर असेल असे म्हटले जात आहे. अनिता आनंद यांच्याकडे कॅन संरक्षण खाते सोपवल्यानंतर हरजीत सज्जन यांच्याकडे परराष्ट्र खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात आले आहेत. यामध्ये अनिता आनंद यांच्यावर देशाच्या संरक्षण खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.कॅनडाच्या संरक्षण मंत्रीपदी भारतीय वंशाची असलेल्या अनिता आनंद यांची वर्णी लागली आहे.
2019 मध्ये अनिता आनंद यांची सार्वजनिक सेवा आणि खरेदी मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. कॅनडात कॅबिनेट मंत्री बनणाऱ्या त्या पहिल्या हिंदू ठरल्या. त्यांनी देशासाठी covid-19 ची लस खरेदी करण्यात यश मिळाल्यामुळे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या पाठिंब्याने संरक्षण खात्यात बढती मिळाली. ओटावा येथील रिड्यू हॉलमध्ये एका समारंभात गव्हर्नर-जनरल मेरी मे सायमन यांनी मंत्र्यांना शपथ दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात आले आहेत. यामध्ये अनिता आनंद यांच्यावर देशाच्या संरक्षण खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अनिता आनंद यांच्या आधीही भारतीय वंशाचे हरजीत सज्जन हे संरक्षण मंत्री होते. लष्करातील प्रमुख सुधारणांवर अनिता आनंद यांचा भर असेल असं म्हटलं जात आहे.
अनिता आनंद यांच्याकडे संरक्षण खाते सोपवल्यानंतर हरजीत सज्जन यांच्याकडे परराष्ट्र खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. हरजीत यांच्यावर लष्करातील व्यभिचाराची प्रकरणे हाताळण्यात अपयश आल्याचे आरोपही झाले आहेत. अनिता यांच्याकडून आता लष्करातील या प्रकरणात लक्ष घालून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचं आव्हान असणार आहे.
अनिता यांचा जन्म 1967 मध्ये नोवा स्कोटिया इथं झाला. त्यांचे आई वडिल दोघेही भारतीय असून वैद्यकीय क्षेत्रात आहेत. अनिता यांची आई सरोज या पंजाबच्या तर वडील एस व्ही आनंद हे तामिळनाडुचे आहेत. अनिता यांनी टोरांटो विद्यापीठात कायद्याच्या प्राध्यापक म्हणून काम केलं आहे. 2019 मध्ये ओकविले इथून त्यांनी खासदारकीची निवडणूक लढली होती. त्यानंतर त्यांनी मंत्रीपदही सांभाळले होते. कॅनडाच्या एकमेव महिला संरक्षण मंत्री माजी पंतप्रधान किम कॅम्पबेल होत्या, ज्यांनी 1993 मध्ये 4 जानेवारी ते 25 जून या सहा महिन्यांसाठी पोर्टफोलिओ सांभाळला होता.