सोलापूर : विजापूर नाका पोलीस – ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांना पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी निलंबीत केलं आहे. डीबी पथकाच्या प्रमुखासह आठ जणांची मुख्यालयात बदली केल्याची चर्चा आहे.
विजापूर नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील यांच्यावर ठोस कारवाई करत त्यांना थेट निलंबितच केले आहे. तर डीबी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ यांच्यासह आठ जणांना मुख्यालयात आणल्याची चर्चा होत आहे. यात डीबी पथकातील राजकुमार तोळनुरे, श्रीरंग खांडेकर, पिंटू जाधव, शिवानंद भीमदे, अंबादास गड्डम, अतिश पाटील, इम्रान जमादार व राठोड या आठ पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पोलिस आयुक्त हरीश बैजल यांनी अचानक केलेल्या निलंबन आणि बदल्यांच्या चर्चेने शहर पोलिस आयुक्तालयात खळबळ उडाली आहे.
दोन दिवसापूर्वी विजापूर नाका पोलीस ठाणा हद्दी सुरु असेल्या नागेश डान्सबारवर झोन २ च्या सहा पोलीस आयुक्त प्रिती छापा टाकला होता. यावेळी काही डान्स आणि ग्राहक अशा ४२ जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. हा डान्सबार गेली अनेक दिवस अवैधरित्या सुरु आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
याबाबत विजापूर नाका पोलीस ठाण्याकडे तक्रारी दाखल होत्या. पण कारवाई होत नव्हती. तेंव्हा झोन पथकानं स्वतः ही कारवाई केली, यानंतर नूतन पोलीस आयुक्त हरिश बैजल यांनी उदयसिंह पाटील यांच्या कारवाई अहवालावर निर्णय घेतला. कारवाईनंतर डॉ. प्रीती टिपरे यांनी कारवाईची माहिती पोलिस आयुक्त बैजल यांना दिली. त्यानंतर पोलिस आयुक्त बैजल यांनी ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले.
पोलीस खात्यात नवीन साहेब कसे आहेत याबाबत वेगवेगळ्या चर्चा गेले काही दिवस सुरु होत्या. त्यांनी पहिला दिवाळी धमाका वरिष्ठ अधिकाऱ्यावर बेजबाबदारपणा ठपका ठेवून केला आहे.
“अवैध व्यवसायात भागीदारी अथवा संबंध, कामात हयगय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून निर्बंध कायम आहेत”
हरिश बैजल – पोलीस आयुक्त
* बायपासवर कारच्या धडकेनं दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी
बार्शी : कुर्डूवाडी-लातूर बाह्यवळण रस्त्यावर सोमवारी दुपारी चारच्या सुमारास कारने दिलेल्या धडकेमुळे दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर जमलेल्या लोकांनी कारचालक शंकर कापे (रा. लाखेवाडी ता. इंदापुर जि. पुणे) याला पकडले होते, मात्र नंतर तो पळून गेला. याबाबत संजय लक्ष्मण नवले (रा. सुभाषनगर, ताडसौंदणे रोड, तम्मेवार प्लॉट, बार्शी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सायंकाळी 04:00 वा. चे सुमारास फिर्यादीचा मुलगा राहुल संजय नवले (वय-19 वर्षे) व पुतण्या विनायक बाबासाहेब नवले (वय-25 वर्षे ) हे दोघे बायपासवरुन त्यांच्या वीट भट्टीकडे दुचाकीवरुन येत होते. त्यांना आरोपीची सेलेरिओ कार (एमएच 42- एच- 2015 ) ने जोरात धडक दिली. या धडकेत दोघांनाही गंभीर मार लागल्याने ते बेशुध्द झाले. अपघाताचा आवाज ऐकून आलेल्या लोकांनी त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेले.
यावेळी कारचालक शंकर कापे यास पकडून दवाखान्यात नेण्यात आले होते. मात्र नातेवाईक उपचाराच्या धावपळीत गुंतल्याचे पाहून त्याने संधी साधून पलायन केले. या अपघातात दोन्ही गाड्यांचे सुमारे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.