Sunday, October 1, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

पीआय उदयसिंह पाटील निलंबीत, डीबी पथकाच्या प्रमुखासह आठजणांच्या बदलीची चर्चा

Surajya Digital by Surajya Digital
November 3, 2021
in Hot News, गुन्हेगारी, सोलापूर
0
पीआय उदयसिंह पाटील निलंबीत, डीबी पथकाच्या प्रमुखासह आठजणांच्या बदलीची चर्चा
0
SHARES
27
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : विजापूर नाका पोलीस – ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांना पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी निलंबीत केलं आहे. डीबी पथकाच्या प्रमुखासह आठ जणांची मुख्यालयात बदली केल्याची चर्चा आहे.

विजापूर नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील यांच्यावर ठोस कारवाई करत त्यांना थेट निलंबितच केले आहे. तर डीबी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ यांच्यासह आठ जणांना मुख्यालयात आणल्याची चर्चा होत आहे.  यात डीबी पथकातील राजकुमार तोळनुरे, श्रीरंग खांडेकर, पिंटू जाधव, शिवानंद भीमदे, अंबादास गड्डम, अतिश पाटील, इम्रान जमादार व राठोड या आठ पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पोलिस आयुक्त हरीश बैजल यांनी अचानक केलेल्या निलंबन आणि  बदल्यांच्या चर्चेने शहर पोलिस आयुक्तालयात खळबळ उडाली आहे.

दोन दिवसापूर्वी विजापूर नाका पोलीस ठाणा हद्दी सुरु असेल्या नागेश डान्सबारवर झोन २ च्या सहा पोलीस आयुक्त प्रिती छापा टाकला होता. यावेळी काही डान्स आणि ग्राहक अशा ४२ जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. हा डान्सबार गेली अनेक दिवस अवैधरित्या सुरु आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

याबाबत विजापूर नाका पोलीस ठाण्याकडे तक्रारी दाखल होत्या. पण कारवाई होत नव्हती. तेंव्हा झोन पथकानं स्वतः ही कारवाई केली, यानंतर नूतन पोलीस आयुक्त हरिश बैजल यांनी उदयसिंह पाटील यांच्या कारवाई अहवालावर निर्णय घेतला. कारवाईनंतर डॉ. प्रीती टिपरे यांनी कारवाईची माहिती पोलिस आयुक्‍त बैजल यांना दिली. त्यानंतर पोलिस आयुक्‍त बैजल यांनी ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले.

पोलीस खात्यात नवीन साहेब कसे आहेत याबाबत वेगवेगळ्या चर्चा गेले काही दिवस सुरु होत्या. त्यांनी पहिला दिवाळी धमाका वरिष्ठ अधिकाऱ्यावर बेजबाबदारपणा ठपका ठेवून केला आहे.

“अवैध व्यवसायात भागीदारी अथवा संबंध, कामात हयगय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून निर्बंध कायम आहेत”

हरिश बैजल – पोलीस आयुक्त

 

* बायपासवर कारच्या धडकेनं दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी

बार्शी  : कुर्डूवाडी-लातूर बाह्यवळण रस्त्यावर सोमवारी दुपारी चारच्या सुमारास कारने दिलेल्या धडकेमुळे दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर जमलेल्या लोकांनी कारचालक शंकर कापे (रा. लाखेवाडी ता. इंदापुर जि. पुणे) याला पकडले होते, मात्र नंतर तो पळून गेला. याबाबत संजय लक्ष्मण नवले (रा. सुभाषनगर, ताडसौंदणे रोड, तम्मेवार प्लॉट,  बार्शी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सायंकाळी 04:00 वा. चे सुमारास फिर्यादीचा मुलगा राहुल संजय नवले (वय-19 वर्षे) व पुतण्या विनायक बाबासाहेब नवले (वय-25 वर्षे ) हे  दोघे बायपासवरुन त्यांच्या वीट भट्टीकडे दुचाकीवरुन येत होते. त्यांना आरोपीची सेलेरिओ कार (एमएच 42- एच- 2015 ) ने जोरात धडक दिली. या धडकेत दोघांनाही गंभीर मार लागल्याने ते बेशुध्द झाले. अपघाताचा आवाज ऐकून आलेल्या लोकांनी त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेले.

यावेळी कारचालक शंकर कापे यास पकडून दवाखान्यात नेण्यात आले होते. मात्र नातेवाईक उपचाराच्या धावपळीत गुंतल्याचे पाहून त्याने संधी साधून पलायन केले. या अपघातात दोन्ही गाड्यांचे सुमारे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

Tags: #PI #UdaySinghPatil #suspended #DB #squad #eight #transferred#पीआय #उदयसिंहपाटील #निलंबीत #डीबी #पथक #प्रमुख #आठजण #बदली
Previous Post

नांदेडमध्ये शिवसैनिक शेतकऱ्याची भगव्या वस्त्रानेच गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

शिवसेनेचा ऐतिहासिक विजय, कलाबेन डेलकर विजयी; शिवसेनेचे महाराष्ट्राबाहेर दमदार पाऊल

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
शिवसेनेचा ऐतिहासिक विजय, कलाबेन डेलकर विजयी; शिवसेनेचे महाराष्ट्राबाहेर दमदार पाऊल

शिवसेनेचा ऐतिहासिक विजय, कलाबेन डेलकर विजयी; शिवसेनेचे महाराष्ट्राबाहेर दमदार पाऊल

Latest News

बॉलीवूड कलाकार ईडीच्या रडारावर, ईडीची 39 ठिकाणी छापेमारी

बॉलीवूड कलाकार ईडीच्या रडारावर, ईडीची 39 ठिकाणी छापेमारी

by Surajya Digital
September 15, 2023
0

...

सोलापूरच्या दुहेरी पाईपलाईनचे जवळपास 9 किलोमीटरचे काम पूर्ण

सोलापूरच्या दुहेरी पाईपलाईनचे जवळपास 9 किलोमीटरचे काम पूर्ण

by Surajya Digital
September 14, 2023
0

...

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, सरकारला एक महिना 10 दिवसांचा दिला वेळ

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, सरकारला एक महिना 10 दिवसांचा दिला वेळ

by Surajya Digital
September 14, 2023
0

...

सीईओंच्या दालनात धुडगूस घालून तोडफोड; धनगर समाजाच्या चौघांना घेतले ताब्यात

सीईओंच्या दालनात धुडगूस घालून तोडफोड; धनगर समाजाच्या चौघांना घेतले ताब्यात

by Surajya Digital
September 12, 2023
0

...

जिल्हा परिषदेच्या तब्बल 20  कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा

जिल्हा परिषदेच्या तब्बल 20 कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा

by Surajya Digital
August 17, 2023
0

...

शाळेतील शिपायाने शेततळ्यात जीवन संपवले, सुनेसह तीन नातवंडांना आजोबांनी वाचवले

शाळेतील शिपायाने शेततळ्यात जीवन संपवले, सुनेसह तीन नातवंडांना आजोबांनी वाचवले

by Surajya Digital
August 10, 2023
0

...

ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांचे निधन

ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांचे निधन

by Surajya Digital
August 9, 2023
0

...

जयंत पाटील व अमित शाह यांच्यात भेट ? फडणवीसांनी दिले उत्तर

जयंत पाटील व अमित शाह यांच्यात भेट ? फडणवीसांनी दिले उत्तर

by Surajya Digital
August 6, 2023
0

...

टीका करणारे अजित पवारांकडून मोदी – शहांचे तोंडभरून कौतुक

टीका करणारे अजित पवारांकडून मोदी – शहांचे तोंडभरून कौतुक

by Surajya Digital
August 6, 2023
0

...

मोदींना चोर म्हटल्यावर राहुल गांधी वर गुन्हा दाखल होतो तर भिडेंवर का नाही? – राजू शेट्टी

मोदींना चोर म्हटल्यावर राहुल गांधी वर गुन्हा दाखल होतो तर भिडेंवर का नाही? – राजू शेट्टी

by Surajya Digital
August 5, 2023
0

...

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com

Categories

  • Hot News
  • Techनिक
  • Uncategorized
  • Videos
  • अर्थाअर्थ
  • खेळ
  • गुन्हेगारी
  • टॉलीवुड
  • देश – विदेश
  • ब्लॉग
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिवार
  • सोलापूर

वार्ता संग्रह

November 2021
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« Oct   Dec »
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697