नवी दिल्ली : टेस्लाचे मालक एलन मस्क भारतात आपली सुपरफास्ट इंटरनेट सेवा स्टारलिंक लॉन्च करणार आहे. स्टारलिंक ही उपग्रह इंटरनेट सेवा आहे. कंपनी या सेवेद्वारे भारतीय वापरकर्त्यांना उपग्रहावर आधारित ब्रॉडबँड आणि इतर संपर्क सेवा देणार आहे. लवकरच यूजर्स स्टारलिंकच्या सुपरफास्ट इंटरनेट स्पीडचा आनंद घेऊ शकतील. पहिल्या टप्प्यात दिल्ली आणि आसपासच्या ग्रामीण भागातील शाळांना 100 हून अधिक मोफत उपकरणे वितरित केली जाणार आहे.
जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलन मस्क ची कंपनी SpaceX शी संलग्न असलेल्या Starlink ने भारतात रजिस्ट्रेशन केले आहे. ही कंपनी सॅटेलाइटद्वारे इंटरनेट सुविधा पुरवते. SpaceX च्या उपग्रह ब्रॉडबँड आर्म स्टारलिंकने डिसेंबर 2022 पर्यंत भारतात 2 लाख ऍक्टिव्ह टर्मिनल्ससह ब्रॉडबँड सर्व्हिस सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, असे कंपनीच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले. कंपनीला आता फक्त सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा आहे.
या क्षेत्रात, ते Amazon Inc व्यतिरिक्त भारती Airtel आणि OneWeb, UK सरकारची जॉईंट व्हेंचर कंपनी यांच्याशी थेट स्पर्धा करेल. सरकारकडे दाखल केलेल्या डॉक्युमेंट्सनुसार, स्टारलिंक सॅटेलाइट कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची ही कंपनी भारतात ब्रॉडबँड आणि इतर सॅटेलाईट आधारित सर्व्हिस देण्यासाठी लायसन्ससाठी अर्ज करेल.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कंपनीने म्हटले आहे की, SpaceX आता भारतातील 100 टक्के मालकीची कंपनी आहे. त्याचे नाव SSCPL – Starlink सॅटेलाइट कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड आहे. स्टारलिंकचा दावा आहे की, तिला भारतातून 5,000 पेक्षा जास्त प्री-ऑर्डर मिळाल्या आहेत.
Starlink इंटरनेटच्या प्री-बुकिंगसाठी, $ 99 म्हणजेच सुमारे 7,300 रुपये सुरक्षा म्हणून भरावे लागतील, जे राउटर इत्यादीसाठी असतील. पेमेंट पूर्ण झाल्यावर, बुकिंग तुमच्या स्थानावर निश्चित होईल. सुरुवातीला, बीटा टेस्टिंग दरम्यान ग्राहकांना 50-150Mbps स्पीड मिळेल, जरी Elon Musk ने म्हटले आहे की, टेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर, 300Mbps पर्यंतचा वेग दिला जाईल.
ही सिक्योरिटी 100% परत करण्यायोग्य आहे म्हणजेच बुकिंग केल्यानंतर तुमचा विचार बदलल्यास तुम्ही ते रद्द करू शकता आणि पैसे परत मिळवू शकता.
* जगातील पहिलेच श्रीमंत व्यक्ती
जगातील धनकुबेरांच्या पंक्तीतील टेस्ला कंपनीचे मालक एलन मस्क यांच्या संपत्तीत दिवसेंदिवस वाढच होत असून, 300 अब्ज डॉलर्स कमावणारे ते जगातील पहिलेच श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.
मस्क यांच्या संपत्तीत 9.79 अब्ज डॉलर्स अर्थात् 73,210 कोटी रुपयांची वाढ झाली. त्यानंतर त्यांची एकूण संपत्ती 302 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे.
हा पल्ला गाठणारे मस्क हे जगातील एकमेव व्यक्ती आहेत. सोबतच टेस्लाचे भांडवलही एक लाख डॉलर्सच्या पार गेले आहे. ब्लुमबर्गने जारी केलेल्या अब्जाधीशांच्या यादीनुसार, जगातील दुसर्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती अॅमेझॉनचे जेफ बेजोस आहेत. त्यांची संपत्ती 199 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. मस्क यांची संपत्ती बेजोस यांच्यापेक्षा 100 अब्ज डॉलर्सने अधिक आहे. म्हणजेच, मस्क यांना मागे टाकण्यासाठी अन्य श्रीमंत व्यक्तींना फार मोठा पल्ला गाठावा लागणार आहे.