वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि त्यांची पत्नी जिल बायडन यांनी काल गुरुवारी व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी केली. ट्विट करुन बायडन यांनी दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. ‘अंधारानंतर ज्ञान, समज आणि सत्य असते, याची आपल्याला दिवाळीच्या प्रकाशाने सदैवं आठवण करुन द्यावी,’ असे बायडन यांनी म्हटले आहे. दरम्यान न्यूयॉर्कमध्ये दिवाळीनिमित्त आतषबाजी करण्यात आली आहे.
भारतासह जगभरात दिवाळी मोठ्या उत्सहाने साजरी करण्यात येत आहे. सामान्यांसह जागतिक नेत्यांनीही दिवाळी साजरी केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, अमेरिकेचे उपाध्यक्ष कमला हॅरिस आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी देखील दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
जो बायडन आणि अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडन यांनी भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. व्हाईट हाऊसमध्ये हे दोघेही दिवाळी साजरी करताना दिसले.
अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी देखील शुभेच्छा देत , ‘अमेरिकेत आणि जगभरात दिव्यांचा सण साजरा करणाऱ्या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या वर्षीची दिवाळी विनाशकारी महामारीच्या काळात आणखी खोल अर्थ घेऊन येत आहे. ही दिवाळी आपल्याला आपल्या देशातील सर्वात पवित्र मूल्यांची आठवण करून देते.’ असे म्हणत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Happy Diwali to everyone celebrating the festival of lights in the US&around the world. This yr #Diwali arrives with an even deeper meaning in midst of a devastating pandemic.The holiday reminds us of our nation's most sacred values: US VP Kamala Harris
(Source: US VP's Twitter) pic.twitter.com/decXhfpcof
— ANI (@ANI) November 4, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
व्हाईट हाऊसमध्ये दीप प्रज्वलन करतानाच ‘दिवाळीचे दिवे आपल्याला आठवण करून देतात की अंधारातून बाहेर आलं की ते शहाणपण आणि सत्य आहे. अमेरिका आणि जगभरात साजऱ्या होणाऱ्या हिंदू, शीख, जैन आणि बौद्ध धर्मियांना आमच्या तर्फे दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो.’ असा संदेश त्यांनी दिला आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी देखील देशवासियांना शुभेच्छा देत ‘आमच्या सर्व कठीण प्रसंगानंतर, मला आशा आहे की ही दिवाळी आमच्यासाठी आनंद घेऊन येईल . वर्षाचा हा काळ कुटुंब आणि मित्रांना भेटण्यासाठी असतो. जेव्हा आपण गेल्या नोव्हेंबरचा विचार करतो तेव्हा आपण खूप पुढे आलो आहोत यात शंका नाही.’
इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी माझे मित्र नरेंद्र मोदी आणि भारतात आणि जगभरात राहणाऱ्या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा, असे ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत,त्याचबरोबर अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात प्रथमच वन वर्ल्ड ट्रेड सेंटर दिवाळी थीमवर आधारित ॲनिमेशनने सजवण्यात आली आहे. यावेळी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली, आणि जी हडसन नदीच्या दोन्ही बाजूंनी रोषणाई करण्यात आली आहे.