पुणे : अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र येत्या 24 तासात अजून दाट होण्याची शक्यता आहे. चांगली बाब म्हणजे ते किनारपट्टीपासून दुर जात आहे. पण त्याचा प्रभाव पुढचे 2 दिवस कोकण किनारपट्टी आणी संलग्न भागावर असेल. त्यातच आज पुण्यासह, नाशिक, अहमदनगर, सातारा, सांगली, ठाणे, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दहा जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.
हवामान खात्याने आज पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज पुण्यासह, नाशिक, अहमदनगर, सातारा, सांगली, ठाणे, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग
या दहा जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.
आज सकाळपासूनच संबंधित जिल्ह्यात ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. पुढील काही तासांत संबंधित जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुढचे 2-3 दिवस राज्यात वीजांच्या गडगडाटासहीत काही ठिकाणी पावसाची शक्यता . येत्या 5 दिवसांत आपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा . तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/JYmdPo98tJ भेट द्या pic.twitter.com/1FBovngr8Z
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) November 5, 2021
दरम्यान याठिकाणी 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच लांबचा प्रवास टाळण्याचा सल्लाही हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दुसरीकडे, आज मुंबई, पालघर, बीड, लातूर, सोलापूर, उस्मानाबाद या जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज सकाळपासूनच या जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली असून मागील चोवीस तासांत मुंबईत 10 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. सोलापुरात पाऊस झाला नाही. पण ढगाळ वातावरण होते.
पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे. तसेच राज्याच्या इतर काही जिल्ह्यांमध्ये पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
नाशिक शहराला काल मुसळधार पावसानं झोडपलं आहे. काल मध्यरात्रीपर्यंत शहरात 31.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर, मान्सून हंगाम संपल्यानंतर शहरात आतापर्यंत 71.3 मिमी पाऊस कोसळला आहे. तसेच किमान तापमानात 3 अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. आजही राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
उद्या राज्यात पावसाचा जोर काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता असून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांनाच येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोमवारनंतर राज्यात कोरड्या हवामानाची शक्यता आहे.