मुंबई : हवामान खात्याने आज (शनिवारी) पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. याठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. रविवारी राज्यात सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्हयातच पावसाचा इशारा देण्यात आला. याव्यतिरिक्त रविवारी पुणे, रायगड, सांगली, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत.
महाराष्ट्रात पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. पुढील तीन दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. भारतीय हवामान विभागाच्या मुंबई कार्यालयाने पुढील चार दिवसांसाठीचा हवामानाचा अंदाज आज शुक’वारी जारी केला. अरबी समुद्रातील हवामानाच्या स्थितीमुळे पुढील दोन तीन दिवसात महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
पुढील तीन दिवस दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर रविवारीपासून राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.
Thunderstorm accompanied with lightning, gusty winds & moderate to intense spells of rain very likely at isolated places in the districts of Thane, Raigad, Nasik, Ahmednagar, Pune, Satara, Ratnagiri, Sindudurg and Kolhapur during next 3-4 hours. pic.twitter.com/gWI632mCP6
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) November 5, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आज पुण्यासह एकूण १२ जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. याठिकाणी पुढील काही तासांत विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
शुक्रवारी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नगिरी, सिंधुदुर्ग, रायगड, लातूर, सोलापूर, उस्मानाबाद, बीड आणि अहमदनगर या बारा जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय मुंबई, ठाणे, नाशिक,आणि नांदेड या जिल्ह्यांतही तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत. शनिवारी राज्यात पावसाचा जोर मंदावणार असून कमी अधिक प्रमाणात हीच स्थिती कायम राहणार आहे. शनिवारी पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यांना अलर्ट दिला आहे. याठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात शुक्रवारी (ता. 5) सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली असून, ढगांचा जोरदार गडगडाट सुरू होता. सलग तिसर्या दिवशी अवकाळी पावसामुळे ऐन दिवाळीत नागरिकांची तारांबळ उडाली. भात शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. गेले तीन दिवस अचानक पडत असलेल्या पावसामुळे कापणी करून वाळत घातलेल्या भात पिकाचे शेतात पाणी साचल्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे.