श्रीपूर : गळीत हंगाम २०२०-२१ करिता श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्यास देशातील नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लि, नवी दिल्ली यांचा प्रथम क्रमांकाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट पुरस्कार नवी दिल्लीत कारखाना पुरस्कार सोहळ्यात प्रदान केला.
केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी.एल.वर्मा, माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, फेडरेशनचे उपाध्यक्ष केतनभाई शाह यांचे हस्ते व उत्तर प्रदेशचे सचीव भुसा रेडडी, सी.ए.सी.पी.चे अध्यक्ष नवीन प्रकाश व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, नॅशनल फेडरेशनचे मॅनेजिग डायरेक्टर प्रकाश नाईकनवरे यांचे उपस्थिती होती.
आमदार प्रशांत परिचारक यांनी सांगितले की, श्री पांडुरंग कारखान्याने नेहमीच सभासद शेतक-यांचे हीत जोपासले असून कारखान्याचे संस्थापक चेअरमन श्रध्देय सुधाकरपंत परिचारक यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार कारखान्याचे कामकाज चालू असून पुरस्कार मिळविणेची परंपरा कायम ठेवत याही वर्षी कारखान्याने कार्यक्षमतेमध्ये प्रभावीपणे काम केल्यामुळे नॅशनल फेडरेशनचा देशातील सर्वोच्च पुरस्कार मिळविला आहे.
या पुरस्काराचे वितरण आज रोजी नॅशनल फेडरेशन ऑफ को.ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लि, नवी दिल्ली येथे झाला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी सांगितले की, नॅशनल फेडरेशन ऑफ को.ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लि, नवी दिल्ली ही संस्था प्रत्येक वर्षी साखर कारखानदारीमध्ये सर्वोच्च काम करणा-या साखर कारखान्यांना पुरस्कार देवून सन्मानित करित असते. श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना हा सोलापूर जिल्ह्यामध्ये सातत्याने उस दर जास्तीचा देत असून साखर उता-यामध्येही अग्रेसर आहे.
कारखान्याचे अल्पावधीमध्ये १२५० मे.टन क्षमतेवरुन ६००० मे.टन क्षमतेचे विस्तारीकरण केले असून २२ मेगावॅट क्षमतेचा सहविजनिर्मीती प्रकल्पाची उभारणी केली आहे. तसेच प्रतिदिनी ४५ के.एल.पी.डी. क्षमतेची डिस्टीलरी उभारली आहे. आसवनी प्रकल्पातील सांडपाणी व साखर कारखान्यातील प्रेसमड याद्वारे उत्तम प्रकारच्या कंपोष्ट खताची निर्मीती कारखाना करीत आहे. कारखान्याने अल्पावधीमध्ये अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कार पटकावून कारखान्याच्या वैभवात भर घातली आहे.
श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्यास देशातील प्रथम क्रमांकाचा मिळालेला वसंतदादा पाटील पुरस्कार कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक, व्हा. चेअरमन वसंतराव देशमुख, संचालक दिनकरभाऊ मोरे, दिलीपराव चव्हाण, हरीष गायकवाड, तानाजी वाघमोडे , अरूण घोलप, बाळासाहेब यलमार कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी व त्यांचे अधिकारी यांनी स्वीकारला.
most american restaurants serves fatty foods that is why sometimes i avoid them;;
679270 271877Deference to internet site author , some fantastic entropy. 696614