मोहोळ : मागील किरकोळ भांडणाचा राग मनात धरून नरखेड येथील आठवडा बाजारात पाठीमागून येऊन कोयत्याने वार करून एकाला गंभीर जखमी केल्याची घटना सोमवारी, १५ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजता च्या दरम्यान मोहोळ तालुक्यातील नरखेड येथे आठवडा बाजारांमध्ये घडली.
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवार, १५ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास नरखेड येथील आठवडा बाजार असल्याने वसंत ताकमोगे हे भाजीपाला खरेदी करत असताना दत्तात्रय ताकमोगे याने पाठीमागून येऊन मागील किरकोळ भांडणाचा राग मनात धरून अचानक हातात कोयत्याने त्यांच्या डोक्यावर, अंगावर वार करण्यास सुरुवात केली. त्यांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने गंभीर जखमी केल्याची फिर्याद जखमीचे भाऊ अंगद ताकमोगे यांनी मोहोळ पोलिस ठाण्यात दिली. यावरुन यात दत्तात्रय ताकमोगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आशुतोष चव्हाण हे करीत आहेत.
* घोंगडे वस्तीत तरुणाचा खुनाचा प्रयत्न, पाच जणांवर गुन्हा; एकाला अटक
सोलापूर – फ्रुट बियर पिण्यासाठी आलेल्या ग्राहकांची वाहने आमच्या घराजवळ लावू नका असे सांगितल्याचा कारणावरून चाकू लोखंडीरॉड आणि लाथाबुक्क्याने केलेल्या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना भवानी पेठेतील घोंगडे वस्ती येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणात जोडभावीपेठच्या पोलिसांनी ५ जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सुनील हनुमंतु नाटेकर (वय २८ रा. भवानीपेठ,घोंगडे वस्ती ) असे जखमीचे नाव आहे. त्याला गंभीर अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले . त्याने दिलेल्या फिर्यादीवरून सैदप्पा शिंदे , चेतन शिंदे , प्रशांत शिंदे , नितीन होटकर आणि सोनू होटकर अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला .त्यापैकी प्रशांत शिंदे (वय २२) याला पोलिसांनी अटक केली.
जखमी सुनील नाटीकर यांच्या घराजवळ सैदप्पा शिंदे याचा फ्रूटबियर विक्रीचा व्यवसाय आहे. बियर पिण्यासाठी आलेले ग्राहक त्यांची वाहने नाटीकर यांच्या घरासमोर लावले होते. ती वाहने येथे लावू नका, असे सांगितल्यानंतर सैदपा शिंदे याने त्यांचा भाऊ आणि घरातील लोकांना मारहाण केली होती. त्याचा जाब विचारले असता वरील पाच जणांनी मिळून लोखंडी रॉड, चाकू आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. अशी नोंद पोलिसात झाली. सहाय्यक निरीक्षक कुलकर्णी पुढील तपास करीत आहेत.
* भाळवणीत भावकीतील दोन गटात मारहाण, तिघे जखमी
सोलापूर : पंढरपूर-भाळवणी येथे भावकीतील शेत बांधावरील झाड तोडण्याचा कारणावरून दोन गटात कुहाड,काठी आणि लाथाबुक्क्याने केलेल्या मारहाणीत एका महिलेसह तिघे जण जखमी झाले. ही घटना सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. या संदर्भात सलीम साहेबलाल मुलाणी (वय ४१) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फारुख लतिफ मुलाणी त्याची पत्नी सबिया या दोघा विरुद्ध गुन्हा दाखल झाला . जखमी सलीम हे बांधावरील झाडाच्या फांद्या तोडत होते. त्यावेळी फारूक मुलानी याने त्यांना कुऱ्हाडीने मारहाण केली . तर सलीम मुलाणी याच्यासह चौघांना काठी आणि दगडाने केलेल्या मारहाणीत फारूक आणि त्यांची पत्नी साबिया अशी दोघे जखमी झाले.दोघांना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. याची नोंद पंढरपूर पोलिसात झाली . सहाय्यक फौजदार जगताप पुढील तपास करीत आहेत.
511601 706576Merely a smiling visitor here to share the really like (:, btw great style and design . 153255