मुंबई : राज्यात मालेगाव, नांदेड, अमरावती इथे झालेल्या दंगली या सुनियोजित कारस्थान होतं. याबाबत महाराष्ट्र पोलिसांनी गृह मंत्रालयाला अहवाल सादर केला आहे. पोलिसांच्या तपासात सोशल मीडियावरील 60 ते 70 पोस्ट समोर आल्या आहेत. या पोस्टमुळे दंगली भडकल्याचा संशय आहे. यातील एक पोस्ट ही त्रिपुरामध्ये 7 मशिदी पाडल्याची फेक न्यूज सांगणारी आहे. त्यानंतर काही हजार पोस्ट सोशल मीडियावर फॉरवर्ड झाल्या आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दंगलींची स्क्रिप्ट ही आधीच लिहिली गेली होती. पोलिसांच्या तपासात सोशल मीडियावरील 60 ते 70 पोस्ट समोर आल्या आहेत. या पोस्टमुळेच दंगली भडकल्याचा संशय आहे. यातील एक पोस्ट ही त्रिपुरामध्ये 7 मशिदी पाडल्याची फेक न्यूज सांगणारी आहे. त्यानंतर काही हजार पोस्ट सोशल मीडियावर फॉरवर्ड झाल्यात. गृह मंत्रालयाच्या अहवालात दंगलीला कारणीभूत ठरलेल्या 36 पोस्टचा उल्लेख आहे.
या अहवालात काही मुस्लिम संघटना आणि राजकीय पक्षांची भूमिका संशयास्पद असल्याचं म्हटलं आहे. 12 आणि 13 नोव्हेंबरलाही अशाच अनेक पोस्ट जाणूनबुजून व्हायरल करून लोकांची माथी भडकवली गेलीयेत. आता कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर मंत्रालय पोलिसांना कारवाईबाबत निर्देश देण्याची शक्यता आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* शरद पवारांना इशारा
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भाजपचे नेते अनिल बोंडे यांनी विनंती वजा इशारा दिला आहे की, शरद पवार यांनी अमरावतीत पाय ठेवू नये, असा इशाराच दिला आहे.
अनिल बोंडे यांनी शरद पवार यांना इशारा आणि विनंती करताना म्हटलं आहे, पवारसाहेब तुम्ही अमरावतीत येऊ नका, तुम्हाला नागरीक आणि शेतकऱ्यांच्या मोठ्या रोषाला सामोरं जावं लागेल.
अमरावतीत ज्या 40 हजार मुस्लिमांना मोर्चा काढला, नंगा नाच केला, त्यामागे नवाब मलिक आहेत, या नवाब मलिकांसोबत दंगलीच्या सुत्रधारांचे फोटो झळकत आहेत, या नवाब मलिकांचे संरक्षक हे शरद पवार आहेत. तरी देखील शरद पवार कोणत्या तोंडाने विदर्भ दौऱ्यावर येत आहेत, ते समजत नसल्याचं अनिल बोंडे यांनी म्हटलं आहे.
विदर्भात अवकाळी पाऊस, संत्रा फळगळती, पिक विमा यांची कोणतीही भरपाई शेतकऱ्यांना मिळालेली नाही तरी देखील शरद पवार हे विदर्भ दौऱ्यावर कोणत्या तोंडाने आले आहेत, असा सवालही उपस्थित केलाय.