मुंबई : मुंबईच्या अंधेरी पश्चिम भागात क्लीन अप मार्शला मारहाण करण्यात आली आहे. एक महिला रिक्षामध्ये मास्क तोंडाच्या थोडं खाली घालून जात होती. अशातच बीएमसीच्या दोन क्लीन-अप मार्शल्सनी त्या महिलेचे फोटो काढून 200 रुपयांच्या दंडाची पावती फाडली. यावरुन महिला आणि क्लीन-अप मार्शलमध्ये बाचाबाची सुरु झाली. त्यानंतर या महिलेनं या दोन्ही क्लीन अप मार्शलला मारहाण केली.
गुरुवारी (ता.18 ) संध्याकाळी ही घटना घडली. क्लीन-अप मार्शलच्या दादागिरीमुळे एका महिलेकडून दोन क्लीन-अप मार्शलला मारहाण करण्यात आली आहे.
एक महिला रिक्षामध्ये मास्क तोंडाच्या थोडं खाली घालून जात होती. अशातच बीएमसीच्या दोन क्लीन-अप मार्शल्सनी त्या महिलेचे फोटो काढून 200 रुपयाच्या दंडाची पावती फाडली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मात्र, यावरुन महिला आणि क्लीन-अप मार्शलमध्ये बाचाबाची सुरु झाली आणि याचे रुपांतर हाणामारीत झाले.
यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. यात क्लीनअप मार्शल गंभीररित्या जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी मुंबई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसाकडून मारेकऱ्यांचा शोध सुरु आहे.
जुहू परिसरात काही नागरिक तोंडाला मास्क न लावता फिरत होते. यावेळी मास्कविना नागरिक फिरत असल्यामुळे क्लीन अप मार्शलने त्यांना हटकले. क्लीनअप मार्शलने कारवाई म्हणून त्यांना दंड देण्यास सांगितले. यावेळी नागरिक तसेच मार्शल यांच्यात वाद झाला. या वादाचे रुपांतर नंतर हाणामारीत झाले. नागरिक आणि मार्शल यांच्यात जोरदार हाणामारी झाली.