Sunday, May 29, 2022
सुराज्य डिजिटल
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

आर्यन खान प्रकरणाच्या तपासावर प्रश्नचिन्ह, एनसीबीला मोठा धक्का

Surajya Digital by Surajya Digital
November 20, 2021
in Hot News, टॉलीवुड, महाराष्ट्र
7
आर्यन खान प्रकरणाच्या तपासावर प्रश्नचिन्ह, एनसीबीला मोठा धक्का
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : आर्यन खान प्रकरणात NCB ने कट रचल्याचे कलम लावले होते. मात्र त्याबाबतचे पुरावे कोर्टाच्या निदर्शनास आले नाही. त्यामुळे NCB च्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आर्यनच्या चॅटमध्येही अंमली पदार्थ नेण्यासंदर्भात उल्लेख आढळला नसल्याची माहिती समोर येत आहे. NCB आर्यन खान, अरबाज व मुनमुन धमेचा यांच्या कथित जबाबावर विसंबून राहू शकत नाही, अशी विधाने पुराव्यात अमान्य आहेत, असे मुंबई हायकोर्टाने म्हटले.

न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी २८ ऑक्टोबर रोजी आर्यन खानला जामीन मंजूर केला होता. त्याविषयीच्या मुख्य आदेशाची प्रत त्यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे २९ ऑक्टोबर रोजी दुपारी उपलब्ध केली. त्यानंतर जामिनासाठी हमीदार देण्याची व अन्य कायदेशीर प्रक्रिया संध्याकाळी वेळेत पूर्ण होऊ न शकल्याने आर्यनला ती रात्रही आर्थर रोड तुरुंगात काढावी लागली. त्यानंतर ३० ऑक्टोबर रोजी आर्यन जामिनावर तुरुंगातून बाहेर आला.

तिन्ही आरोपी बेकायदा कृत्य करण्याच्या सामायिक हेतूने एकत्र जमले, हे दाखवणारा कोणताही सकारात्मक व ठोस पुरावा एनसीबीने दाखवलेला नाही. उलट आर्यन खान व अरबाझ मर्चंट आाणि मुनमुन धमेचा यांनी स्वतंत्रपणे प्रवास केला आणि संबंधित गुन्हा करण्यासाठी ते मनाने एकत्र आले नव्हते, असेच एनसीबीच्या आतापर्यंतच्या तपासातून दिसते’, असे न्यायमूर्ती सांब्रे यांनी निरीक्षण नोंदवले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध 

आर्यन खानच्या मोबाईलमधील व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स पाहिल्यास त्यात काहीही आक्षेपार्ह दिसत नाही आणि आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाझ मर्चंट व मुनमुन धमेचा या तिघांनी कोणतेही कट कारस्थान रचल्याचे त्यातून स्पष्ट होत नाही. याविषयीच्या एनसीबीच्या आरोपात तथ्य दिसत नाही’, असे महत्वाचे निरीक्षण मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी नोंदवले आहे.

जामिनाविषयीच्या आदेशाची सविस्तर प्रत आज उपलब्ध झाल्यानंतर हे स्पष्ट झाले आहे. हायकोर्टाचे हे निरीक्षण म्हणजे एनसीबीला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

तपासाच्या या टप्प्यावर कटकारस्थानाचा आरोप स्पष्ट होत असल्याचे दाखवण्यासाठी उच्चस्तरीय पुरावे दाखवण्याची आवश्यकता नसते, असे एनसीबीतर्फे अतिरिक्त महान्यायअभिकर्ता अनिल सिंग यांनी म्हटले. यावर न्यायमूर्तिंनी ते बरोबर असल्याचे म्हटले. परंतु, कारस्थानाचा आरोप दाखवण्यासाठी किमान मूलभूत पुरावे तरी दिसायला हवे आणि त्याविषयी न्यायालयाने संवेदनशील असणे आवश्यक आहे. अर्जदार हे निव्वळ प्रवासासाठी क्रूझवर होते, हा एनडीपीएस कायद्यातील कटकारस्थानाचा आरोप लावण्यासाठी आधार होऊ शकत नाही’, असे न्यायमूर्ती सांब्रे यांनी नोंदवले आहे.

Tags: #Questionmarks #investigation #AryanKhan #case #blow #NCB#आर्यनखान #प्रकरण #तपास #प्रश्नचिन्ह #एनसीबी #धक्का
Previous Post

तब्बल ११ वर्षांनी निर्दोष मुक्तता, होणाऱ्या पत्नीला अश्लील मेसेजेस पाठवणे गुन्हा नाही – कोर्ट

Next Post

एसटी संपाचा परिणाम, विद्यापीठातील पीएच.डीच्या मुलाखती दुसऱ्यांदा लांबणीवर

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
एसटी संपाचा परिणाम, विद्यापीठातील पीएच.डीच्या मुलाखती दुसऱ्यांदा लांबणीवर

एसटी संपाचा परिणाम, विद्यापीठातील पीएच.डीच्या मुलाखती दुसऱ्यांदा लांबणीवर

Comments 7

  1. best soundbar uk 2022 says:
    4 months ago

    How is the new year going? I hope to read more interesting posts like last year

  2. บาคาร่า ขั้นต่ำ 5 บาท says:
    3 months ago

    214939 517371Hello! I just would wish to offer a huge thumbs up for that wonderful information youve here during this post. I will be returning to your website to get a lot more soon. 973674

  3. tinyurl.com says:
    2 months ago

    I do not even know the way I stopped up here, but
    I assumed this put up was once great. I do not recognise who you are but definitely you are going to
    a well-known blogger if you happen to are not already.

    Cheers!

  4. DevOps new trends says:
    2 months ago

    769444 39631This style is steller! You surely know how to keep a reader entertained. Between your wit and your videos, I was almost moved to start my own weblog (effectively, almostHaHa!) Wonderful job. I truly enjoyed what you had to say, and much more than that, how you presented it. Too cool! 614789

  5. tinyurl.com says:
    2 months ago

    It’s actually a great and useful piece of information. I’m
    happy that you simply shared this useful info with us.
    Please keep us up to date like this. Thank you for sharing.

  6. best rates on airfare says:
    2 months ago

    I all the time emailed this webpage post page to all my friends, for the reason that if like to
    read it then my friends will too.

  7. best rates on airfare says:
    2 months ago

    Excellent website. Lots of useful information here.
    I am sending it to a few buddies ans also sharing in delicious.
    And obviously, thank you to your sweat!

वार्ता संग्रह

November 2021
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« Oct   Dec »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697