सोलापूर : मुलगा व्हावा म्हणून सासूच्या सांगण्यावरून पती ठरावीक दिवशीच शारीरिक संबंध ठेवत होता. अंधश्रद्धा पाळणाऱ्या सासूने सुनेला मुलगा व्हावा म्हणून पती-पत्नीच्या शरीरसंबंधाचे वेळापत्रक बनविले होते. सहन न झाल्याने पतीच्या या अनैसर्गिक व राक्षसी शरीरसंबंधाला त्रासून विवाहितेने पोलिसाकडे धाव घेतली.
विजापूर नाका पोलिसांनी विवाहितेच्या फिर्यादीवरुन या प्रकरणातील पती, सासू, सासरा, दोन नणंद व पतीच्या आतेभावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वारंवार अनैसर्गिक व राक्षसी शरीरसंबंध ठेवले आणि त्यातून मला शारीरिक इजादेखील झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. विवाह झाल्यापासून एक वर्ष पतीने अत्याचार केला आणि तब्येत खालावल्यानंतर सासरच्यांनी मे 2020 रोजी माहेरी आणून सोडले. आता ते पतीचा दुसरा विवाह लावून देऊन मला घटस्फोट मागत असल्याची तक्रार पोलिसांत दिली.
विवाहानंतर सासरच्यांनी एका महिन्यातच त्यांचे रूप दाखवायला सुरुवात केली. तुझी लायकी नाही, तुझे आई-वडील आमच्यापेक्षा खूप गरीब आहेत, तू दिसायला सुंदर नाही, वयाने कोवळी आहेस म्हणून पती, सासू, सासरा व दोन्ही नणंद यांनी छळ केला.
पतीने सासूच्या सांगण्यावरून मर्यादेत शरीरसंबंध ठेवले आणि इतरवेळी राक्षसी पद्धतीने अनैसर्गिक अत्याचार केले. अनैसर्गिक अत्याचाराला विरोध केल्याने पतीने मारहाण केली व माहेरील व्यक्तींना मारण्याची धमकीही दिली. याबाबत सासू, सासऱ्याला सांगितल्यानंतर त्यांनी, मुलगा होण्यासाठी ते रास्तच असल्याचे सांगून गप्प बसविले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अमावास्या, पौर्णिमेला पतीला त्यांनी किचनमध्ये झोपण्याचे बंधन घातले होते. वेळापत्रकाला बगल देऊन पतीने शरीरसंबंध ठेवल्याने आता मुलगा होणार नाही म्हणून त्यांनी गर्भपातही केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
अनैसर्गिक संबंधांमुळे तब्येत बिघडली, काहीतरी होईल म्हणून सासऱ्यांनी माहेरी आणून सोडले. त्यानंतर पुन्हा ते न्यायला आलेच नाहीत. त्यांनी आता घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दिला असून, पतीचा दुसरा विवाह लावून देतो असे सांगितल्याचेही विवाहितेने विजापूर नाका पोलिसांना सांगितले. त्यानुसार गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास विजापूर नाका पोलिस करत आहेत.