Thursday, May 26, 2022
सुराज्य डिजिटल
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

25 दिवसांच्या बाळाच्या हत्येप्रकरणी मातेला पोलिस कोठडी

Surajya Digital by Surajya Digital
November 20, 2021
in Hot News, गुन्हेगारी, सोलापूर
9
मोहोळमध्ये कोयत्याने वार तर सोलापुरात पार्किंगवरुन तरुणाचा खुनाचा प्रयत्न
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर : पंचवीस दिवसांच्या बाळाच्या खुनाच्या आरोपावरुन पोलिसांनी त्याची आई प्रतीक्षा संकेत सुरवसे (वय २१, रा. मंगळवेढेकर चाळ, प्रभात टॉकीजमागे) हिला अटक केली आहे. तिला न्यायालयासमोर हजर केले असता पोलिस कोठडी सुनावली.

मंगळवेढेकर चाळीत १० नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजण्यापूर्वी पाण्याने भरलेल्या ड्रममध्ये प्रतीक्षा हिच्या बाळाचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर फौजदार चावडी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली.

पोलिसांनी तपास करून या बाळाचा अज्ञात व्यक्तीने खून केल्याचा गुन्हा दाखल केला होता. याबाबत फौजदार अश्विनी काळे यांनी फिर्याद दिली होती. या बाळाचा खून नेमका कोण व कशासाठी केला? याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत होता. पोलीस घरातील व्यक्ती तसेच अन्य लोकांचीही चौकशी करीत होते. परंतु पोलिसांना अद्याप कोणतेही धागेदोरे मिळत नव्हते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

आठ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पोलिसांनी बाळाची आई प्रतीक्षा हिनेच खून केल्याच्या आरोपावरून तिला अटक केली. तिला शुक्रवारी (ता. १९) न्यायदंडाधिकारी एम. एम. बावरे यांच्यासमोर उभे केले. प्रतीक्षा हिने बाळाचा खून कशासाठी केला याचा तपास करावयाचा असल्याने पोलिसांनी चार दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. परंतु तिला न्यायालयाने एक दिवसाच पोलीस कोठडी दिली आहे.

यात आरोपीतर्फे ॲड. राजेंद्र फताटे हे काम पाहात आहेत.

* समुद्रातील मासा चावल्याने तरुण जखमी

सोलापूर : गोवा येथील बागा बीच येथे समुद्रात पोहताना जेलीफिश चावल्याने प्रथमेश प्रभाकर बोधले वय १८ (रा.वज्रेश्वरी नगर सोलापूर) हा तरुण किरकोळ जखमी झाला ही घटना १२ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली होती. त्याला गोवा येथे प्राथमिक उपचार करुन सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

* लोकमंगल विवाह सोहळा कार्यस्थळात बदल

सोलापूर : लोकमंगलच्यावतीने आयोजित 16 व्या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या कार्यस्थळात बदल करण्यात आला आहे.  हा सामूहिक विवाह सोहळा विजापूर रोडवरील  शिवाजी अध्यापक विद्यालय नेहरूनगर (डी एड कॉलेजच्या) मैदानावर होणार होता. पण सोलापुरात सध्या पावसाचे वातावरण आहे. त्यामुळे हा विवाह सोहळा आता सिद्धेश्‍वर साखर कारखान्याजवळच्या काडादी मंगल कार्यालयात होणार असल्याची माहिती संस्थापक, आ. सुभाष देशमुख यांनी दिली.

गेल्या दोन- तीन दिवसांपासून शहरात पाऊस पडत आहे.  आणखी दोन- तीन दिवस पाऊस पडे, असा हवामान खात्याचा  अंदाज आहे. या स्थितीचा विचार करून वधू-वरांची आणि वर्‍हाडी मंडळींची तारांबळ होऊ नये म्हणून हा विवाह सोहळा आता सिद्धेश्‍वर साखर कारखान्याजवळच्या काडादी मंगल कार्यालयात होणार आहे. तरी विवाह सोहळ्याशी संबंधित लोकांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन आ. सुभाष देशमुख यांनी केले आहे.

Tags: #Mother #remanded #policecustody #murder #baby#बाळाच्या #हत्येप्रकरणी #मातेला #पोलिस #कोठडी
Previous Post

पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची शक्यता, उपकर आकारण्याची शिफारस

Next Post

तब्बल ११ वर्षांनी निर्दोष मुक्तता, होणाऱ्या पत्नीला अश्लील मेसेजेस पाठवणे गुन्हा नाही – कोर्ट

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
तब्बल ११ वर्षांनी निर्दोष मुक्तता, होणाऱ्या पत्नीला अश्लील मेसेजेस पाठवणे गुन्हा नाही – कोर्ट

तब्बल ११ वर्षांनी निर्दोष मुक्तता, होणाऱ्या पत्नीला अश्लील मेसेजेस पाठवणे गुन्हा नाही - कोर्ट

Comments 9

  1. Alyce says:
    4 months ago

    Wow, that’s what I was searching for, what a data! existing here
    at this website, thanks admin of this website.

  2. An says:
    4 months ago

    These are genuinely impressive ideas in concerning blogging.You have touched some good things here. Any way keep up wrinting.

  3. Chadwick says:
    4 months ago

    When I initially commented I appear to have clicked on the
    -Notify me when new comments are added- checkbox and from now
    on every time a comment is added I get four emails with the exact same comment.
    There has to be a way you are able to remove me from that service?
    Many thanks!

  4. Leland says:
    4 months ago

    An outstanding share! I’ve just forwarded this onto acolleague who has been conducting a little research on this.And he in fact ordered me breakfast simply because Istumbled upon it for him… lol. So let me reword this….Thanks for the meal!! But yeah, thanks for spending the time to discuss this issue here on your web page.

  5. Patrica Matone says:
    3 months ago

    My spouse and i ended up being so more than happy Michael could conclude his investigations out of the ideas he obtained while using the weblog. It’s not at all simplistic to simply happen to be giving freely key points which often other people have been trying to sell. And we recognize we need you to thank for this. The specific illustrations you’ve made, the simple website navigation, the relationships your site assist to create – it’s all incredible, and it’s assisting our son and us consider that this matter is fun, which is truly vital. Thank you for the whole lot!

  6. android tv box buyers guide says:
    3 months ago

    Hi there! I know this is sort of off-topic but I had to ask. Does running a well-established blog such as yours take a lot of work? I am brand new to blogging however I do write in my diary on a daily basis. I’d like to start a blog so I can easily share my personal experience and views online. Please let me know if you have any kind of recommendations or tips for brand new aspiring bloggers. Appreciate it!

  7. http://tinyurl.com/ says:
    2 months ago

    Hi there! I just wanted to ask if you ever have any problems with hackers?
    My last blog (wordpress) was hacked and I ended up losing months of hard work
    due to no data backup. Do you have any methods to stop hackers?

  8. http://tinyurl.com/y93x62fb says:
    2 months ago

    I love reading through an article that will make people
    think. Also, thanks for allowing me to comment!

  9. airfare prices says:
    2 months ago

    Wonderful beat ! I wish to apprentice while you amend your website, how can i subscribe for a blog website?
    The account aided me a acceptable deal. I had been tiny bit acquainted of this your broadcast offered bright clear concept

वार्ता संग्रह

November 2021
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« Oct   Dec »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697