नवी दिल्ली : भाजप खासदार वरुण गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. तसेच कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करणारे 700 शेतकरी शहीद झाले आहेत, जर कृषी कायदे आधीच मागे घेतले असते, तर निष्पापांचा जीव वाचला असता, असे गांधी यांनी म्हटले. आता या आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून प्रत्येकी 1 कोटी रुपये देण्यात यावे, अशीही मागणी वरुण गांधी यांनी केली.
या पत्रात वरुण गांधी म्हणाले, या पत्रात वरुण गांधी यांनी मी तीन कृषी कायदे मागे घेण्याच्या घोषणेचे स्वागत करतो. शेतकरी बांधव आंदोलन संपवून सन्मानाने घरी परतावेत. माझी नम्र विनंती आहे की, एमएसपी व इतर मुद्द्यांवर कायदा करण्याच्या मागणीवरही त्वरित निर्णय घेण्यात यावा.
या पत्रात त्यांनी लखीमपूर खेरीची घटना लोकशाहीला लागलेला कलंक आहे. या प्रकरणाशी संबंधित मंत्र्यांवर कठोर कारवाई करावी. त्याचबरोबर देशहिताच्या दृष्टीने हमीभावाचा कायदा करण्यात यावा अशी मागणी केली आहे. तसंच या आंदोलनात 700 शेतकरी शहीद झाले आहेत, त्यांच्या कुटुंबीयांनाही प्रत्येकी 1 कोटींची भरपाई द्यावी. अशी मागणी या पत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.
भाजप खासदार वरुण गांधी यांनी केवळ शेतकरी आंदोलनच नव्हे तर लखीमपूर खिरी येथील घटनेवरूनही आपल्याच पक्षाच्या सरकारला घेरले. लखीमपूरमध्ये 5 शेतकऱ्यांना चिरडण्यात आले. ही घटना लोकशाहीवर काळा डाग आहे. या प्रकरणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सुद्धा वरुण गांधी यांनी केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
उच्च पदस्थ नेत्यांनी सुद्धा कृषी कायद्यांच्या विरोधात झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर उलट-सुलट प्रतिक्रिया दिल्या. त्याच उपेक्षेतून लखीमपूर खिरी सारख्या घटना घडल्या. लखीमपूरमध्ये ऑक्टोबर महिन्यात पाच शेतकऱ्यांना चिरडण्यात आले. ही घटना लोकशाहीवर एक काळा डाग आहे. त्या प्रकरणाची सुद्धा निःपक्ष चौकशी व्यायला हवी. यामध्ये सहभागी असलेल्या केंद्रीय मंत्र्यावर सुद्धा कठोर कारवाई करायला हवी. सरकार लवकरच या मुद्द्यांवर ठोस निर्णय घेईल अशी अपेक्षा करतो असेही वरुण गांधी यांनी आपल्या पत्रातून लिहिले आहे.
* भाजपला रामराम ?
भाजप खासदार वरुण गांधी सध्या स्वपक्षाला खडे बोल सुनावत असल्यानं चांगलेच चर्चेत आहे. तीन कृषी कायदे, लखीमपूर खेरी येथील घटना आणि कंगना रणौत च्या ‘भीक मे मिली आझादी’ या वक्तव्यावर वरुण गांधी यांनी थेट भाजपवर निशाणा साधला आहे.
त्यामुळं ते भाजपला राम राम करणार असल्याची शक्यता आहे. मात्र, वरुण गांधी भाजपला राम राम करुन काँग्रेसमध्ये प्रवेश करणार की ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
ममता बॅनर्जी सध्या तृणमूल काँग्रेसच्या राजकीय विस्तारात व्यस्त आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांनी काँग्रेसच्या अनेक बडे नेत्यांना पक्षात स्थान दिलं आहे. त्यामुळे आता त्या वरुण गांधींना आपल्या पक्षात घेणार असल्याची चर्चा सुरु आहे.