तिरुअनंतपूरम : शुक्रवारपासून झालेल्या पावसामुळे आंध्र प्रदेशातील कडप्पा आणि अनंतपुरम जिल्ह्यात किमान 25 जणांचा मृत्यू झाला असून पावसामुळे झालेल्या घटनांमध्ये 17 हून अधिक लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे. नद्या आणि धरणाच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना काळजी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री पिनराइ यांनी केले आहे.
कडप्पा जिल्ह्यातील चेयरु नदीला शुक्रवारी आलेल्या पुरात 30 हून अधिक लोक वाहून गेले, अशी माहिती सूत्रांनी दिली. तिरुपती शहरातील परिस्थिती अजूनही भीषण आहे आणि अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत.
रायलसीमा विभागात अनेक रस्त्यांन नद्याचे स्वरूप प्राप्त झाले आहेत तर गाड्य पुराच्य पाण्यात वाहून गेले आहेत. राज्यात आतापर्यंत दीड हजारहून अधिक घरांचे नुकसान झाले आहे, तसेच साडेतीन हजार हेक्टर शेतीला फटका बसला आहे. हजारो गुरं पाण्यात वाहने गेले आहेत. रायलसीमा भागात पावसामुळे आतापर्यंत हजारो कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
कडप्पा जिल्ह्यातील राजमपेटा भागात पाच जण पुरात वाहून गेले आहेत. तर चेयेरू भागात 12 जण वाहून गेले असून त्यांचा शोध सुरू आहे. एसडीआरफ आणि ओलिसांनी कडप्पा आणि चित्तू जिल्ह्यात 10 जणांना पुरातून वाचवले आहे. अनंतपूर जिल्ह्यात चित्रावती नदील आलेल्यापुरामुळे 10 जण अडकले होते. हवाई दलाने या 10 जणांची सुटका केली आहे. राज्यात 213 छावण्या उभारल्या असून त्यात 19 हजार 859 जणांनी आसरा घेतला आहे.
जोरदार पाऊस झाल्यामुळे नद्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे धरणांच्या पाण्याच्या पातळीमध्ये देखील वाढ होऊ शकते. नद्या आणि धरणाच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना काळजी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री पिनराइ यांनी केले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तिरुवनंतपुरम, कोल्लम, पथनमथिट्टा, अलाप्पुझा, कोट्टायम आणि इडुक्की जिल्ह्यात अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. एर्नाकुलम, त्रिशुर, पलक्कड, मलप्पुरम, कोझीकोड, कन्नुर, वायनाड, आणि कासरगोड जिल्ह्यामध्येही पाऊस पडण्याची शक्यता आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, 16 नोव्हेंबरपर्यंत केरळच्या एक किंवा दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो.
तिरुवनंतपुरम जिल्ह्यात जास्त नुकसान होण्याची सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. तिरुवनंतपुरम – नगरकोविल मार्गावर रेल्वेट्रॅकवर माती साचली आहे. नेय्यतितिनकारामध्ये राष्ट्रीय राजमार्गावर एका पूलाचा काही भाग पावसामुळे कोसळला आहे.
केरळ किनारपट्टीवरील दक्षिणपूर्व अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे या क्षेत्रात मध्ये 17 ऑक्टोबरच्या पहाटेपर्यंत राज्याच्या विविध ठिकाणी मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने दर्शविली होती. त्याचप्रमाणे 18 ऑक्टोबर रोजी राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची देखील शक्यता आहे आणि 19 ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत पावसाचा जोर कमी होईल असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.
केरळच्या दक्षिण आणि मध्य भागामध्ये मुसळधार पावसामध्ये अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे आणि नद्यांना पूर आला आहे. या पूरजन्य परिस्थितीमध्ये कोटायाम मधून 10 लोक बेपत्ता झाले आहेत. अशी देखील माहिती मिळाली आहे.