भोपाळ : मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथे एका व्यक्तीने (आनंद प्रकाश चौक्से) आपल्या पत्नीला (मंजुषा) ‘ताजमहाल’ सारखे दिसणारे घर गिफ्ट दिले आहे. याचे फोटो व्हायरल झाले आहेत.
४ बेडरुमचे हे घर आहे. हे घर तयार करण्यासाठी ३ वर्षे लागली. या घरामध्ये एक ग्रंथालय आहे. सोबतच मेडिटेशन करण्यासाठी एक स्वतंत्र खोली आहे. या घरात मकराना मार्बल्सचा वापर करण्यात आला आहे. ताजमहाल हे निखळ प्रेमाचे प्रतीक आहे. या प्रेमाची निशाणी म्हणून ताजमहालची प्रतिकृती भेट दिली जाते.
हे ताजमहालसारखे घर बांधण्यासाठी आणि सजवण्यासाठी तब्बल तीन वर्षे लागली. मिळालेल्या माहितीनुसार, या घरात चार बेडरूम, एक मोठा हॉल, एक किचन, लायब्ररी, मेडिटेशन रुम आहे. या आलिशान ताजमहाल प्रमाणे दिसणाऱ्या घराचे क्षेत्रफळ ९० बाय ९० चौरस मीटर इतके आहे. हे घर मध्य प्रदेशचे शिक्षणतज्ज्ञ आनंद प्रकाश चौकसे यांनी बनवले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
याविषयी अधिक माहिती देताना आनंद चौकसे म्हणाले, ताजमहालासारखे घर बांधताना चौकसे यांना अनेक अडचणी आल्या. मात्र त्यांनी अतूट प्रेम आणि विश्वासाच्या जोरावर आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने ताजमहालाप्रमाणे दिसणारे घर यशस्वीरित्या तयार केले आहे. या अवघड घराचे काम पूर्ण करण्यासाठी तब्बल तीन वर्षे लागली, असे घर बांधणारे अभियंता प्रवीण चौकसे सांगतात.
* असे आहे ताजमहालसारखे घर
ताजमहालासारखे दिसणाऱ्या या घराचे क्षेत्रफळ ९० बाय ९० चौरस मीटर इतके आहे. घराची उंची २९ फूट ठेवण्यात आली आहे. यामध्ये ताजमहालसारख्या टॉवरची हुबेहूब प्रतिकृती बनवण्यात आली आहे. याशिवाय घराची फरशी राजस्थानच्या मकराना येथील कामगिरांकडून बनवण्यात आली आहे. घरातील नक्षीकाम हे बंगाल आणि इंदूर येथील कारागिरांनी केले आहे. तर फर्निचर सुरत आणि मुंबईतील कारागिरांनी बनवले आहे. या घरात एक मोठा हॉल, खाली दोन बेडरूम आणि वरच्या मजल्यावर फक्त दोन बेडरूम आहेत. या घराला अनेक पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांसाठी हे घर आता आकर्षणाचा विषय ठरले आहे.