मोहोळ : राष्ट्रीय महामार्गावर वडवळ रेल्वे पुलाजवळ भीषण अपघात झाला आहे. मोटरसायकलला पाठीमागून भरधाव येणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिल्याने वृद्ध दाम्पत्य ठार झाले. मेंदूचा चेंदामेंदा झाल्याचे भीषण दृश पाहावयास मिळाले.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुळगांव कोंबडवाडी येथील मयत अर्जुन नामदेव थिटे व अनिता नामदेव थिटे हे पति-पत्नी सोरेगांव येथील रहिवासी आहेत. ते शेतीच्या कामानिमित्त मूळगांव कोंबडवाडी येथे गावी आले होते.
शेतीची व अन्य कामे उरकुन परत ते मोटार सायकल ( एम .एच.13 AK 7332 क्रंमाक ) वरुन परत जात असताना मोहोळहून सोलापूरकडे जाणाऱ्या मालट्रकने ( क्रमांक अे .पी .39 V 6829 ) पाठीमागून जोराने धडक दिली. यात मोटार सायकलवरील अर्जुन नामदेव थिटे ( वय ६५ ) व अनिता नामदेव थिटे ( वय ६० ) हे दोघा पती पत्नीचा जागीच मृत्यु झाला.
घटनास्थळावर मृतदेहाचे मेंदुचे तुकडे अत्यावस्त विखुरल्याने अतिशय भयानक चित्र दिसत होते. याबाबतची खबर पोलीसांना मयताचे पुतणे सचिन शंकर थिटे यांनी दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मालट्रकच्या चालकास अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.
मृत अर्जुन नामदेव थिटे हे निवृत्त एसआरपी कर्मचारी असून त्यांना उत्कृष्ट कामगिरी बद्दल राष्ट्रपती पदक मिळाले होते. मृत अर्जुन थिटे यांना एक मुलगा, सुन व दोन मुली आहेत.
* ट्रकची ट्रॅव्हल्स बसला धडक
सोलापूर – ट्रक चालकाने अतिवेगाने वाहन चालवून ट्रॅव्हल्स बसला धडक दिल्याची घटना २२ नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सोलापूर एसटी स्टँड समोर घडली. याप्रकरणी काशिनाथ भगवंत हुगार (फुलारी) (वय-३०,एन जी चाळ, गणपती मंदिरजवळ सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीवरून ट्रक क्र.एम.एच.१३.आर.३८२० या ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
ट्रक चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रक हे अती वेगाने चालवून फिर्यादी यांच्या ट्रॅव्हल्स क्र.के.ए ५१. ए.जी.०२३८ ला पाठीमागून धडक दिली. त्यानंतर बसच्या मागील टेल लॅम्प, डिक्की, आपत्कालीन दरवाजा, मागील काच, स्पीकर कोचचे पाच सीट चिमटून फुटून नुकसान झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. बसमधील प्रवाशांना हादरा बसून मुक्का मार लागून जखमी होण्यास कारणीभूत झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलिस नाईक पैकेकरी हे करीत आहेत.