मुंबई : राज्यात सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटावा यासाठी राज्य सरकारने आज महत्वपूर्ण घोषणा केली आहे. कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर आता कर्मचाऱ्यांशी चर्चा करून संपासंदर्भात निर्णय घेऊ, असं सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं. आजचा मुक्काम आझाद मैदानावर असणार, असंही त्यांनी सांगितलं.
एसटीच्या इतिहासातली सर्वात मोठी पगारवाढ सरकारने केली असल्याचे म्हटले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात पाच हजारांची वाढ करत महागाई भत्ता शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे देण्याचा निर्णय जाहीर करताना 14 दिवस सुरु असलेला संप मागे घेण्याचं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे.
मात्र, एस.टी कर्मचारी विलणीकरणावर ठाम आहेत. गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांनी आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांशी भेट घेवून उद्या सकाळी ST कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत भूमिका मांडणार असल्याचे जाहीर केले.
एसटीच्या इतिहासातली सर्वात मोठी पगारवाढ सरकारने केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात पाच हजारांची वाढ करत महागाई भत्ता शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे देण्याचा निर्णय जाहीर करताना 14 दिवस सुरु असलेला संप मागे घेण्याचं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे. मात्र, एस.टी कर्मचारी विलणीकरणावर ठाम आहेत. गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांनी आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांशी भेट घेवून उद्या सकाळी ST कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत भूमिका मांडणार असल्याचे जाहीर केले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आज रात्रभर आझाद मैदानात थांबून एसटीच्या सर्व विभागातील कर्मचाऱ्यांशी रात्रभर चर्चा करणार आहोत. तसेच योग्य विचार करुन उद्या सकाळी ST कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत भूमिका मांडणार असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगीतले. यामुळे आजची रात्रही संपाची शेवटची रात्र ठरते की नेमकं काय होते हे उद्या सकाळीच स्पष्ट होईल.
पगारवाढीसह निलंबन मागे घेणार, सेवा समाप्ती मागे घेणार अशी, घोषणा अनिल परब यांनी केलीय. सर्व कामगारांनी संप मागे घ्यावा. उद्या सकाळी 8 वाजता कामावर हजर रहा, असे आवाहन अनिल परब यांनी केले आहे. कामावर हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांवरील निलंबन आणि बडर्फीची कारवाई मागे घेणार असल्याचे परिवहन मंत्र्यांनी जाहीर केले आहे.
परिवहन मंत्र्यांच्या घोषणेनंतर देखील एसटी कर्मचा-यांचा आंदोलन मागे घेण्यास नकार आहे. पगारवाढीचे गाजर नको विलीनीकरण हवं असे कर्मचारी म्हणाले. ही वेतनवाढ आम्हाला अजिबात मान्य नाही. सर्व कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहे. विलिनीकरण झालं तर जनतेलाही फायदा होणार आहे. बसच्या तिकिटात 40 टक्के कमी होईल, असा दावा कर्मचाऱ्यांनी केला आहे.
आंदोलन हे रबरासारखं असतं, जास्त ताणल्यास तुटतं अशी सूचक प्रतिक्रिया सदाभाऊ खोत यांनी परिवहन मंत्र्यांच्या बैठकीपूर्वी दिली होती. मात्र, सरकारने पगारवाढीचा प्रस्ताव देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.
* एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात नेमकी किती वाढ होणार?
– 1 ते 10 वर्षे सेवा- मूळ वेतनात 5 हजाराची वाढ
– 10 ते 20 वर्षे सेवा – मूळ वेतनात 4 हजार रुपयांची वाढ.
– 20 वर्षे आणि त्याहून अधिक सेवा 2 हजार 500 रुपयांची वाढ.