नाशिक : नाशिकच्या निफाड तालुक्यातील मरळगोई येथील महिला सरपंचानं आपल्या राहत्या घरात विष प्राशन करून आत्महत्या केली. सासरच्या सततच्या त्रासाला कंटाळून या महिला सरपंचाने विष प्राशन करुन आत्महत्या केली.
योगिता अनिल फापाळे असं आत्महत्या करणाऱ्या महिलेचं नाव असून त्या मरळगोई (खु.) गावच्या सरपंच होत्या. सासरच्या सततच्या त्रासाला कंटाळून योगिता यांनी विष प्राशन केलं. याप्रकरणी पोलिसांनी पती अनिल फापाळे याच्यासह सासरच्या तिघांना अटक केली आहे.
मयत सरपंच महिलेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून पतीसह सासरकडच्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तिघांना अटकही करण्यात आली आहे. महिला सरपंच झाल्यानंतर तिच्या सासरी तिचा छळ सुरु झाला. सासरच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला वैतागून महिलेने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या भावाने केला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भावाने दिलेल्या तक्रारीनंतर महिला सरपंचाच्या पतीसह सासरच्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. महिला सरपंचाच्या मृत्यूबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मयत महिला सरपंच योगिता फापाळे यांचे भाऊ संतोष शांताराम गवळी यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संतोष गवळी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की सरपंच झाल्या पासून माझ्या बहिणीचा तिच्या सासुरवाडीचे लोक छळ करत होते.
तक्रारीत म्हटल्यानुसार, माझ्या बहिणीचा कोणत्याही कारणावरून वारंवार मानसिक व शारीरिक छळ केला जात होता. योगिताने सासरच्या छळाला कंटाळून विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची तक्रार गवळी यांनी केली आहे.
सासरे बाबासाहेब फापाळे, पती अनिल बाबासाहेब फापाळे, सासु सरला फापाळे आणि दीर प्रदीप फापाळे (सर्व रा. मरळगोई खुर्द) या चौघांविरुद्ध लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पतीसह सासरच्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
Some truly nice stuff on this website , I it.
I’m a blog crazed person and i love to read cool blog like yours.~`;.,
When I originally commented I clicked the -Notify me when new surveys are added- checkbox and after this if a comment is added I purchase four emails with the exact same comment. Can there be that is you can remove me from that service? Thanks!
Hi, i think that i saw you visited my web site so i came to “return the favor”.I am trying to find things to enhance my web site!I suppose its ok to use some of your ideas!!