नवी दिल्ली : भारतीय खेळाडूंना पोर्क आणि बीफ खाण्यावर बीसीसीआयने बंदी घातली असून आहारात फक्त हलाल मटण खावे, असे निर्देश दिल्याचे वृत्त समोर आले आहे. यानंतर सोशल मीडियावर यावरुन मोठा वाद सुरू झाला आहे. यानंतर ट्वीटरवर #BCCI_Promotes_Halal हा हॅशटॅगही ट्रेंडमध्ये आला आहे, ज्यामध्ये भारतीय क्रिकेट बोर्डाची खिल्ली उडवली जात आहे.
मात्र यावर बीसीसीआयचे अधिकारी अरुण धुमाळ यांनी हे वृत्त फेटाळले आहे. खेळाडूंनी काय खावे आणि काय खाऊ नये, याविषयी बीसीसीआय सल्ला देत नाही, असे धुमाळ यांनी स्पष्ट केले आहे.
कोणताही क्रिकेटपटू कसरतीबरोबर त्याच्या आहाराबाबतही तितकाच शिस्तबद्ध असतो. परंतु भारतीय क्रिकेट संघ त्यांच्या आहाराच्या नव्या योजनेवरुन ट्रोल होतो आहे. बीसीसीआयने भारतीय क्रिकेटपटूंना हलाल सर्टिफाइड मांस खाणे बंधनकारक केल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टिका होते आहे.
हाती दिलेल्या वृत्तानुसार, नव्या आहार योजनेनुसार भारतीय क्रिकेटपटूंना कोणत्याही प्रकारचे पॉर्क किंवा बीफ खाण्याची परवानगी दिली गेलेली नाही. क्रिकेटपटूंच्या तंदुरुस्ती आणि तब्येतीला पाहता हे पाऊल उचलले गेले आहे. जर कोणत्याही क्रिकेटपटूला मांस खायचे असल्यास त्याला हलाल सर्टिफाइड मांसच खावे लागणार आहे. अन्यथा ते कोणत्याही प्रकारचे मांस खाऊ शकत नाहीत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
क्रिकेटचा येता नवा हंगाम आणि आयसीसीच्या जागतिक स्तरावरील वेगवेगळ्या क्रिकेट स्पर्धांदरम्यान भारतीय क्रिकेटपटूंना फिट ठेवण्यासाठी बीसीसीआयने त्यांच्या आहाराच्या योजनेबाबत कठोरता दाखवली आहे. या आहार योजनेद्वारे कोणाचेही वजन वाढू नये याचीही काळजी घेण्यात आली आहे.
#bcci_promotes_halal
Why so pic.twitter.com/88XnwleoN5— Raj Jadhav (@rrj789) November 23, 2021
कोरोना महामारीमुळे क्रिकेटपटूंना सतत जैव सुरक्षित वातावरणात राहावे लागत आहे. यामुळे त्यांना सातत्याने क्रिकेट खेळण्यात अडचणी येत आहेत. तसेच ते प्रत्येक स्वरुपात त्यांची उर्जा टिकवून ठेवू शकत नाहीयत. त्यामुळे क्रिकेटपटूंना त्यांच्या आहारसंबंधी सतर्कता बागळायला सांगितले गेले आहे. त्यातही जे क्रिकेटपटू मांसाहारी आहेत आणि ज्यांना रोज मांस खाण्याची सवय आहे, त्यांना आपल्या आहारावर विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
यानंतर सोशल मीडियावर बीसीसीआयवर हलाल सर्टिफाइड अन्नाचा प्रचार करण्याचा आरोप लावला जात आहे. अनेकांनी धर्माशी याचा संबंध जोडत बीसीसीआयवर निशाणा साधला आहे. त्यामुळे एक नवा वाद पेटताना दिसतो आहे. कारण हिंदू संघटना हलाल मांसाला विरोध करतात. त्यांचे म्हणणे आहे की, हलाल सर्टिफाइड अन्नाद्वारे इस्लामी कायद्याला प्राधान्य दिले जाते. हिंदू आणि शिख धर्मामध्ये हलाल मांस खाल्ले जात नाही. दुसरीकडे इस्लाम धर्मामध्ये केवळ हलाल मांसच खाल्ले जाते.