सातारा : शिवसेना नेते व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. शिवसेनेला एकाकी पाडण्याचा प्रयत्न होत असेल तर शिवसेनेला पर्याय खुले असल्याचे आणि आघाडी धर्म पाळण्याचा आम्ही प्रयत्न केला. पण जर सातारा जिल्ह्यात शिवसेनेची अवहेलना होते असेल तर पक्ष प्रमुखांच्या परवानगीने आम्हाला सुद्धा जिल्ह्यात वेगळे निर्णय घेण्यासाठी परवानगी मागणार असल्याचे ते म्हणाले.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला आहे. पराभवानंतर शंभूराज देसाईंनी प्रतिक्रिया देताना महाविकास आघाडीवर घणाघणाती आरोप करत केली स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे.
माझ्या प्रतिस्पर्ध्यांनी गेले दोन महीने सणासुदीच्या काळात सुध्दा मतदार बाहेर ठेवले याला परिवर्तन म्हणतात का? महाविकास आघाडी आपला साताऱ्यात आघाडी धर्म पाळत नसेल तर शिवसेना येथून पुढील सर्व निवडणूका स्वबळावर लढणार असे ते म्हणाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
निवडणूक म्हटलं तर जय पराजय होतोच तो मी स्वीकारलाय. परंतु 102 मताच्या निवडणुकीला परिवर्तन अस म्हणता येत नाही. परिवर्तन हे मी मागील चार महिन्यापुर्वी दाखवल आहे. माझ्या प्रतिस्पर्ध्यानी गेले दोन महीने सणासुदीच्या काळात सुध्दा मतदार बाहेर ठेवले याला परिवर्तन म्हणतात का, असा सवाल उपस्थित केला.
माझे पक्षश्रेष्ठी उद्धव ठाकरे यांना मी सांगणार आहे, जर महाविकास आघाडी आपला साताऱ्यात आघाडी धर्म पाळत नसेल तर शिवसेना येथून पुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढणार आहे.
राज्यात सध्या जिल्हा बँकांच्या निवडणुकीचं वातावरण तापलं आहे. जिल्हा बँकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यस्तरीय नेत्यांकडून मला आपण एकत्रित निवडणूक लढवायची आहे, असे निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सांगितले जात होते. मात्र, तीन पक्षात एकमेकांविषयी नाराजीचे सुर उमटले आहेत. आता राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी राष्ट्रावादी विषयी थेट नाराजी दाखवत गंभीर आरोप केला.
दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकांवरून शंभुराज देसाई यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. कोणाच्या मदतीने कोणाचा विजय होतो तर कोणाचा पराभव होतो. प्रत्येकवेळी राजकारण मात्र वेगळ असतं. मी माझा पराभव खिलाडू वृत्तीने स्वीकारत आहे, असं शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे. 102 मतांच्या निवडणुकीला पराभव असं म्हणता येणार नाही, असंही शंभूराज देसाई म्हणाले आहेत.