सोलापूर : सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणीचे निमित्त करून काहीजण काडादी कुटुंबाला त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहेत. स्व आप्पांनाही शेवटच्या काळात असा त्रास सोसावा लागला. काडादी कुटुंबाला त्रास झाला तरी चालेल पण कारखान्याला त्याची झळ बसत असल्याचे सांगत कारखानास्थळावरील बैठकीत सिद्धेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी यांनी काही क्षण भावनाविवश होऊन डोळ्यातून अश्रू काढले.
कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम घोषित झाला आहे. यावर विचार विनिमय करण्यासाठी कार्यक्षेत्रातील राजकीय नेते आणि सभासदांची बैठक आप्पासाहेब काडादी मंगल कार्यालयात झाली. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे उपस्थित होते. यावेळी मंचावर माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, सिद्रामप्पा पाटील, राजशेखर शिवदारे, शिवशरण बिराजदार, बाळासाहेब शेळके, शिवानंद दरेकर, शरण काडादि, ,आनंद तानवडे , सुरेश हसापुरे, कल्याणराव पाटील, जाफरताज पाटील यांची उपस्थिती होती.
सभेत धर्मराज काडादी म्हणाले, चिमणी पाडली तर कारखाना बंद करावा लागेल. चिमणीच्या बांधकामास मंजुरी मिळण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले आहेत. नियमाला धरूनच चिमणीचे बांधकाम केले आहे. व्यक्तिगत द्वेषातून चिमणी पाडण्यासाठी चुकीच्या पद्धतीने दबाव आणला जात आहे, तरीही आम्ही कायदेशीर मार्गाचा अवलंब करून ती नियमित करून घेऊ, असा विश्वास काडादी यांनी सभेत व्यक्त केला. तसेच आमच्या विरोधात काम करा पण संस्थेला वेठीस धरू नका, असे आवाहनही बैठकीत केले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
चांगलं काम करताना टीकाटिपणी मतभेद होत असतात आप्पांना शेवटच्या काळात त्याचा खूप त्रास झाला, परंतु संयमाने त्यांनी तोंड दिले तोच वारसा मी जपतोय, आता मात्र मी कंटाळलोय, नव्यांना संधी दिली पाहिजे, असे मतही धर्मराज काडादी यांनी मांडले.
सभेत कारखान्याच्या चिमणी पाडकामाविषयी चर्चा झाली. सर्वांनी यावर मत मांडले. सिद्धेश्वरची चिमणी पाडण्यामागे राजकारण आहे. चिमणी पाडल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे धर्मराज काडादी यांच्या सोबत राहून कारखान्याच्या विरोधात काम करणाऱ्या मंडळींना उपस्थित नेत्यांनी इशारेही दिले.
चिमणी आणि निवडणूक या दोन्ही मुद्द्यांवर राजशेखर शिवदारे , सिद्धाराम म्हेत्रे, शिवानंद दरेकर, बाळासाहेब शेळके, शिवशरण पाटील , दत्ता घोडके , भीमाशंकर जमादार, चंद्रकांत सुर्वे यांनी काडादी यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. आगामी निवडणुकीत उमेदवार निवडीचे अधिकार धर्मराज काडादी यांना देण्यात यावेत, अशा सूचना करण्यात आल्या त्यावर ज्येष्ठ आणि सर्वपक्षीय नेत्यांची समिती स्थापन करण्याची कल्पना काडादी यांनी मांडली.
* विमानतळापेक्षा काडादी घराण्यावरील द्वेषापोटी आरोप
धर्मराज काडादी यांनी कारखान्याच्या गाळप हंगाम , आर्थिक अडचणी आणि चिमणी पाडण्यासाठी संभाव्य कारवाई यावर भाष्य केले. शरद पवार, ज्योतिरादित्य शिंदे, विजयसिंह मोहिते पाटील, अजित पवार, एकनाथ शिंदे या मंडळींनी नेहमीच सहकार्य केले आहे. कायदेशीर लढाई सुरूच आहे, मात्र विमानतळापेक्षा काडादी घराण्यावरील द्वेषापोटी काही मंडळी चिमणीसाठी अडून बसल्याचा आरोपही यावेळी केला.
i bought a lot of SEO Softwares and some of them are just very expensive and not so useful for the price“
501032 733828When I originally commented I clicked the -Notify me when new surveys are added- checkbox and from now on whenever a comment is added I purchase four emails sticking with exactly the same comment. Maybe there is by any indicates you might get rid of me from that service? Thanks! 223326