बीड : बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ मंदिराला आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. एका पत्राद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. वैद्यनाथ मंदिर संस्थानाकडे खूप पैसे आहेत. ५० लाख रुपये द्या अन्यथा आरडीएक्सने मंदिर उडवून देवू, असे धमकी देणारे पत्र मुख्य विश्वस्तांच्या नावाने आले आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
मंदिराला आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन केलं आहे. तसेच प्रभू वैद्यनाथ मंदिराची एक विट सुद्धा इकडची तिकडे होणार नाही, असं ते म्हणाले. शिवाय गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, डीजीपी आणि बीड पोलीस अधीक्षक आणि दहशतवाद विरोधी पथकास माहिती दिल्याचं त्यांनी सांगितलं.
ट्विटमध्ये मुंडे म्हणाले आहेत की,’श्री क्षेत्र परळी वैद्यनाथ या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एका ज्योतिर्लिंग मंदिरास आरडीएक्सने उडवण्याची धमकी मंदिर ट्रस्टला मिळाली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, डीजीपी, बीड एसपी, तसेच दहशतवाद विरोधी पथकास याबाबत माहिती दिली असून, पोलीस खाते याबाबत त्वरित अॅक्शन घेत आहे.’
श्री क्षेत्र परळी वैद्यनाथ या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एका ज्योतिर्लिंग मंदिरास आरडीएक्सने उडवण्याची धमकी मंदिर ट्रस्टला मिळाली आहे. गृहमंत्री @Dwalsepatil साहेब, @DGPMaharashtra , @BEEDPOLICE ,तसेच दहशतवादी विरोधी पथकास याबाबत माहिती दिली असून,पोलीस खाते याबाबत त्वरित ऍक्शन घेत आहे
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) November 26, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
वैद्यनाथ प्रभू दुःख, अडचणी, आजार बरे करणारे वैद्य हे नाव घेऊन परळीत अनादी कालापासून विराजमान आहेत. ५० लाख रुपयांची मागणी करून धमकी देणारे गजाआड दिसतील’, असेही मुंडे म्हणाले आहेत.
धमकी देणारं पत्र नांदेडहून आल्याची प्राथमिक माहिती आहे. पत्राचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी मंदिराच्या सुरक्षेत वाढ केली आहे. धमकी मिळाली असल्यानं मंदिर प्रशासन चांगलेच धास्तावले आहे.
परळी शहर पोलीस स्टेशनला धमकीचे पत्र मिळाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परळी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
I couldn’t resist writing comments. “All successful people men and women are big dreamers. They imagine what their future could be, ideal in every respect, and then they work every day toward their distant vision, that goal or purpose.” by Brian Tracy..