सोलापूर : दुसऱ्या पत्नीवर अनैसर्गिक बलात्कार केल्याप्रकरणी एका वकिलाला विरुद्ध जोडभावी पेठच्या पोलिसांनी नुकताच गुन्हा दाखल केला. महेश हरिष चंद्र मोहिते ( रा. हेमांगी सोसायटी, अलिबाग) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
ती पीडित महिला पहिल्या पतीपासून विभक्त राहत होती. तिच्या परिचयातील महेश मोहिते ( रा.अलिबाग) याने तिला पतीला सोडचिठ्ठी देण्यासाठी मदत केली. आणि तिला आपण देखील घटस्फोटीत असून तुझ्याशी विवाह करतो असे खोटे सांगून तिच्याशी ६ ऑक्टोबर २०१५ रोजी वाशी (नवी मुंबई) येथे मंदीरात लग्न केले.
त्यानंतर तिला पनवेल येथे खोली घेऊन राहण्याची सोय केली होती.काही दिवसानंतर महेशचे घटस्फोट झालेल नसून तो पहिल्या पत्नीसोबत राहात असल्याचे तिला समजले. या कारणावरून दोघात वाद झाला. घटस्पोट झाल्याशिवाय मी नांदणार नाही असे सांगून ती सोलापुरात आली. महेश विरुद्ध पनवेल पोलीसात तक्रार दाखल केली. दरम्यान पीडितेला मुलगी झाली. पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतो आणि तुला नीट नांदवतो, मुलीच्या नावावर प्रॉपर्टी करतो असे स्टॅम्पवर लिहून देऊन महेशने तिला पोलिसात दिलेली तक्रार मागे घेण्यास लावली.
पीडिता सोलापुरात असताना 14 एप्रिल 20 21 रोजी महेश हा पत्नी आणि बाळाला भेटला करतात सोलापुरातील घरात आला होता त्यावेळी त्यांनी शरीरसंबंधाची मागणी केली तिने घटस्फोट घेतल्याशिवाय संबंध ठेवणार नाही, असे सांगितले असता त्याने बळजबरीने तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार करीत व्हिडीओ शूटिंग केले.
त्यानंतर पहिल्या पत्नीचे घटस्फोटाबद्दल विचारले असता त्याने चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल करतो, अशी धमकी दिली, अशा आशयाची फिर्याद त्या पीडित यांनी पोलिसात दाखल केली. पुढील तपास सहायक निरीक्षक कुलकर्णी हे करीत आहेत.
* अल्पवयीन तरुणीचा विनयभंग तरुणाविरुद्ध पोक्सोचा गुन्हा
विडी घरकुल परिसरात एका अल्पवयीन तरुणीचा पाठलाग करून तिच्याशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी नितेश भरत सावंत (रा.मंगळवेढा) याच्याविरुद्ध एमआयडीसी च्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला.ती तरुणी रविवारी सायंकाळी घरातून किराणा दुकानाकडे निघाली होती. त्यावेळी नितेश सावंत याने दुचाकीवरून तिचा पाठलाग केला. तू माझ्यासोबत बोलली नाही तर तुझे फोटो व्हायरल करतो .अशी धमकी दिली होती. पुढील तपास सहायक निरीक्षक मोरे हे करीत आहेत.
* रेल्वे ब्रिज जवळ ट्रॅक्टरच्या धडकेने दुचाकीवरील तरुण ठार
सोलापूर – भैय्या चौकातील रेल्वे ब्रिज जवळ ट्रॅक्टरच्या धडकेने दुचाकीवरील तरुण गंभीर जखमी होऊन मरण पावला. हा अपघात बुधवारी रात्रीच्या सुमारास घडला.
विकास केदार पवार (वय २४ रा.शिवाजी चौक,उत्तर कसबा) असे मयताचे नाव आहे. तो काल रात्री नऊ वाजेच्या सुमारास मित्रांसोबत दुचाकीवरून देगाव नाक्याकडे निघाला होता. रेल्वे ब्रिज जवळ ट्रॅक्टरच्या धडकेने दोघे जण जखमी झाले होते. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले असता विकास पवार हा उपचारादरम्यान मयत झाला. या अपघाताची नोंद सदरबाजार पोलिसात झाली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* दुचाकीचा अपघात; जखमीचा मृत्यू
जेऊर (ता.अक्कलकोट) येथे दुचाकीच्या अपघातामध्ये जखमी झालेला राजशेखर लक्ष्मण हडपद (वय २५ रा.जेऊर) हा सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार घेताना काल बुधवारी रात्री मरण पावला. तो रविवारी सायंकाळच्या सुमारास गावातून शेताकडे निघाला होता. पावसामुळे दुचाकी घसरल्याने तो खाली पडून डोक्यास मार लागून गंभीर जखमी झाला होता. त्याला अक्कलकोट येथे प्राथमिक उपचार करून सोलापुरात दाखल करण्यात आले होते .अशी प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे .
* बंद घर फोडले पण फक्त पाण्याची मोटार नेली
बार्शी : बंद घर फोडलेले पण फक्त घरातील पाण्याची मोटार चोरुन नेल्याची अजब घरफोडी सुभाषनगर भागातील वाणी प्लॉट मध्ये झाली आहे. याबाबत घरमालक अनिल विश्वभंर घंटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शहरात पाणीपुरवठ्याचा भरवसा नसल्यामुळे बहुसंख्य नागरिकांनी नळाला पाणी आल्यानंतर ते जास्त प्रमाणात खेचण्यासाठी मोटारी बसविल्या आहेत. शहरातील अनियमित पाणीपुरवठ्याचा सर्वाधिक फटका अलिकडे सुभाषनगर भागाला बसला आहे. त्यामुळे चोरटा कृत्रिम पाणीटंचाईला वैतागलेला होता का? अशी उपहासात्मक चर्चा या घरफोडीची माहिती सर्वत्र पसरल्यावर होत आहे. अनिल घंटे यांचे आडत दुकान आहे. ते आगळगाव रस्त्यावरील वाणी प्लॉट मध्ये राहतात. ते दि. 16/11/2021 रोजी कुटूंबासह पुणे येथे गेले होते. त्यामुळे गेले दहा दिवस घर बंद होते. गुरुवारी दि. 25/11/2021 रोजी सायंकाळी 06/00 वा चे सुमारास ते पुण्यावरुन परत आले. तेंव्हा त्यांना घराचा मुख्य दरवाजा उघडा असलेला दिसला.
घरामध्ये आत जावुन पाहिले असता घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. त्यानंतर त्यांनी घरातील सर्व खोल्या व सामान तपासले असता सर्व सामान जागेवर होते. मात्र घराच्या आवारातील हौदावर असलेली अर्धा एचपीची पाणी उपसा करण्याची मोटार मात्र गायब झाली होती. त्यांनी मोटारीचा आसपास शोध घेतला मात्र ती सापडली नाही. त्यामुळे आपली मोटार चोरीस गेल्याची त्यांची खात्री झाली.
* मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा
मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी लक्ष्मण अरुण शेनमारे (वय-३८,रा. मु.पो. पिंपळा, (बुद्रुक) ता.तुळजापूर,जि.उस्मानाबाद) यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.त्यांच्या फिर्यादीवरून आयशर टेम्पो क्रमांक एम.एच.१६.सी.सी ६७०६ या क्रमांकाच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,फिर्यादी यांचे वडील अरुण दिगंबर शेनमारे (वय-७०, उस्मानाबाद) सोलापूर मार्केट यार्ड येथे फुले आणण्यासाठी जुना तुळजापूर नाका सोलापूर येथे खाजगी वाहनाने आले व तेथून पायी चालत मार्केट यार्ड कडे जात असताना वरील आयशर टेम्पो क्रमांकाच्या चालकाने निष्काळजीपणाने व भरधाव वेगात वाहन चालवून फिर्यादीच्या वडिलांना धडक देऊन त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत करून मृत्यूस कारणीभूत ठरला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात झाली असून, या घटनेचा पुढील तपास पोसई ताकभाते हे करीत आहेत.