बार्शी : भर रस्त्यात मुलांसमोर पत्नीचा कोयत्याने सपासप वार करुन खून करणार्या किरण तुकाराम घरबुडवे (रा. भांतबरे ता. बार्शी) यास अखेर वैराग पोलिसांनी जेरबंद केले आहे.
पत्नीला जीवे मारल्यानंतर तो घटनास्थळावरुन दुचाकीवरुन पळून गेला होता. पोलिस त्याच्या मागावर होते. आज तो बार्शीत असल्याचे समजल्यानंतर पोलिस पथकाने जावून त्यास ताब्यात घेतले.
सासूरवाडीला तालुक्यातील धामणगाव येथे पत्नी व मुलांसह आलेला किरण मंगळवारी (ता. २३) सकाळी ९ च्या सुमारास भातंबरे या आपल्या गावी परतत होता. रस्त्यात मुंगशी(आर.) ते उपळे दुमाला दरम्यान दुचाकीवरच त्यांच्यात वाद होवू लागल्यानंतर गाडी थांबवून त्याने गवतात लपवून ठेवलेला कोयता काढून बेसावध सोनालीवर वार केले.
गंभीर जखमी होवून जागेवरच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर तो पळून गेला. खूनामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून तपासाधिकारी पो.नि. विनय बहीर अधिक तपास करीत आहेत. सोनालीला मारल्यानंतर किरण मुंगशी – गौडगाव – तुळजापूर – सोलापूर – पुणे -गुलबर्गा असा फिरत बार्शीस आला होता. त्याचा माग काढून अखेर त्यास गजाआड करण्यात आले.
* एटीएम फोडण्याच्या तयारीत असलेल्या पाचजणांना अटक
सोलापूर : तवेरा गाडी घेऊन त्याद्वारे
एटीएम फोडून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला फौजदार चावडी पोलीस पोलीस पथकाने अटक करुन त्यांच्या मुसक्या आवळल्या.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या घटनेची हकीकत अशी की, २४ नोव्हेंबर च्या पहाटेच्या सुमारास जुना पुना नाका येथे नाकाबंदी करत असताना फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बर्डे यांना मिळालेल्या माहितीनुसार तिथे उभ्या असलेल्या तवेरा गाडी क्रमांक एम एच २४ व्ही ६४४ मधील दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणाला रोख रक्कम व साहित्यासह अटक केली.
संतोष संजय कांबळे (वय २९, अक्षय दिगंबर शिंदे दोघे रा. जय मल्हार चौक, भगवती मंदिराच्या मागे आडवां नळ सोलापूर), चंद्रकांत विठ्ठल दीक्षित, (वय २५ सतीश अनिल गायकवाड २४ रा दोघे शिवगंगा नगर भाग ५, कुमठा नाका सोलापूर) आणि आकाश महादेव माडगे (वय २० रा. कलपा मैत्री वस्ती, कुमठा नाका, सोलापूर ) या पाच जणांना अटक केली.
त्यांच्या ताब्यातून पाच लाख रुपये किंमतीची पांढऱ्या रंगाची तवेरा गाडी, आठ वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल, १५ हजार रोख रक्कम, एक लोखंडी हातोडा, एक लोखंडी पार, एक लोखंडी टॉमी, लोखंडी छनी, मोठे चाकू, लोखंडी कोयता, सेट बॅ बेन्टेक्स दागिने, टायटन लेडीज घड्याळ, overline 1004 रंगाची असलेली मारतुल, मिरची पावडर असा जवळपास ५ लाख ७७ हजार २५९ रुपयांचा ऐवज जप्त केला. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक देशमाने हे करीत आहेत.