Saturday, May 28, 2022
सुराज्य डिजिटल
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

मुंबईत 22 डिसेंबरपासून राज्याचं हिवाळी अधिवेशन

Surajya Digital by Surajya Digital
November 29, 2021
in Hot News, महाराष्ट्र, राजकारण
10
मुंबईत 22 डिसेंबरपासून राज्याचं हिवाळी अधिवेशन
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : राज्याचं हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार आहे. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 22 डिसेंबर ते 28 डिसेंबर दरम्यान होणार आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच पुढील कामकाजासंदर्भात विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक 24 डिसेंबरला घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अधिवेशनाला प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. अधिवेशन वाढवायचं किंवा नाही याचाही विचार केला जाईल, असं राज्याचे संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी सांगितलं आहे. या हिवाळी अधिवेशनात एकूण 12 विधेयकं असणार आहेत. तर तारांकीत प्रश्नांसंदर्भात गुरुवारी सभापती यांच्याकडे बैठक होणार आहे, असं परब यांनी सांगितलं.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

अनिल परब म्हणाले की, 24 डिसेंबरला पुन्हा बैठक घेऊन अधिवेशन वाढवायचं किंवा नाही यावर निर्णय होईल. तसेच ज्यांचे दोन डोस झाले आहेत त्यांनाच अधिवेशनामध्ये प्रवेश मिळणार आहे, असं परब यांनी सांगितलं.

* ठाकरे सरकारचे अधिवेशन टाळण्याचे प्रयत्न

कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, 4 ते 5 दिवसांचं तोकडं अधिवेशन होणार आहे. पहिला दिवस पुरवणी मागण्यांचा असणार आहे. आमची मागणी होती की अधिवेशनाचा कालावधी वाढवावा. संसदीय कामकाजात ठाकरे सरकारला रस नाही, अधिवेशन टाळण्याचे प्रयत्न ठाकरे सरकारकडून होतो आहे हे स्पष्ट आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

फडणवीस म्हणाले की, 3 दिवस ब्रेक घेऊन पुन्हा अधिवेशन घ्या अशी आमची मागणी आहे. पुन्हा एकदा कामकाज सल्लागार समितीची मिटींग होणार आहे. त्यानंतर पुन्हा अधिवेशन कालावधी निश्चित करु असे सांगितलं आहे. 2 वर्षात एकाही अतारांकित प्रश्न, लक्षवेधीला उत्तर दिलेले नाही. याबाबत मी नाराजी व्यक्त केली आहे.

प्रलंबित अतारांकित प्रश्नांना उत्तरे दिली जातील असे आश्वासन दिलं गेलं आहे. रोज प्रश्नोत्तरे आणि लक्षवेधी होईल असे आश्वासन मिळाले आहे, असंही फडणवीस म्हणाले. फडणवीस म्हणाले की, अधिवेशन नागपूरलाच झाले पाहिजे अशी आमची मागणी आहे. जाणिवपूर्वक अधिवेशन नागपूरला घेतले जात नाही. मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीचे कारण यामागे देण्यात आले आहे, असं फडणवीसांनी म्हटलं.

Tags: #Mumbai #22nd #December #Fadnavis #accused #wintersession#मुंबई #22डिसेंबरपासून #राज्याचं #हिवाळी #अधिवेशन #फडणवीस
Previous Post

शिस्तप्रिय म्हणून ओळखल्या जाणा-या भाजपची अब्रू पुन्हा चव्हाट्यावर

Next Post

भारताच्या हाती आलेली टेस्ट अखेर ड्रॉ ! अखेरचा सामना मुंबईत

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
भारताच्या हाती आलेली टेस्ट अखेर ड्रॉ ! अखेरचा सामना मुंबईत

भारताच्या हाती आलेली टेस्ट अखेर ड्रॉ ! अखेरचा सामना मुंबईत

Comments 10

  1. best blackout blinds says:
    4 months ago

    An intriguing discussion may be worth comment. I believe that you can write regarding this topic, it will not be a taboo subject but usually people are insufficient to talk on such topics. To the next. Cheers

  2. Xiomara Bladen says:
    4 months ago

    Youre so cool! I dont suppose Ive read anything such as this before. So nice to discover somebody by original applying for grants this subject. realy thanks for beginning this up. this website is one thing that is required on-line, a person after a little originality. helpful problem for bringing new things for the world wide web!

  3. Cyril Matta says:
    3 months ago

    Great – I should definitely say I’m impressed with your web site. I had no trouble navigating through all tabs as well as related information. It ended up being truly easy to access. Great job..

  4. food processor buying guide says:
    3 months ago

    As soon as I noticed this web site I went on reddit to share some of the love with them.

  5. AbertFax says:
    3 months ago

    скільки буде тривати війна в україні 2022 скільки буде тривати війна в україні 2022 війна в україні 2022 пророцтва

  6. AbrtFax says:
    3 months ago

    Фільм Бетмен (2022) дивитись онлайн Дивитись фільм Бетмен Фільм Бетмен дивитись онлайн

  7. AbrtFax says:
    3 months ago

    http://bit.ly/legenda-destan-vse-serii

  8. AbrtFax says:
    3 months ago

    https://bitbin.it/xUNGaaQL/

  9. AbrtFax says:
    3 months ago

    https://t.me/holostyaktntofficial2022

  10. AbrtFax says:
    2 months ago

    Человек-паук Вдали от дома

वार्ता संग्रह

November 2021
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« Oct   Dec »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697