मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. त्यानुसार महाराष्ट्रातील सहा विभागांमध्ये राज ठाकरेंचा दौरा आयोजित करण्यात आला.
येत्या 14 डिसेंबरला राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर येणार आहेत. दरम्यान, मनसेच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज मुंबईत झाली. या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. राज ठाकरे गत काही दिवसांपासून आपल्या मुंबईतील नव्या निवासस्थानी राज्यभरातील नेत्यांच्या भेटीगाठी घेत होते. परिणामी या भेटीगाठीतून राज्यभराचा दौरा ठरला असल्याची माहिती मिळत आहे.
राज ठाकरे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्यानं ते सार्वजनिक कार्यक्रमांना जात नव्हते. पण आता तब्येत पुर्ण बरी झाल्यानंतर राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दौऱ्याचं नियोजन केलं आहे. राज ठाकरे आपला दौरा 6 डिसेंबरपासून सुरू करणार आहेत. पहिल्यांदा ते पुण्यामध्ये आपल्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.
आगामी पुणे महापालिका निवडणुकीत मनसेला पुणे शहरात अधिक जागा जिंकण्याची अपेक्षा आहे. या अगोदरही राज ठाकरे यांनी सातत्यानं पुणे शहराचा दौरा केला आहे. त्यांनतर राज ठाकरे यांचा दौरा हा मराठवाड्यात आहे. मराठवाड्याची राजधानी मानली जाणारी औरंगाबाद येथे ते आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दरम्यान, राज ठाकरे आपल्या दौऱ्यादरम्यान राज्यातील विविध सहा ठिकाणी जाणार आहेत. राज ठाकरे हे कोकण दौऱ्यावर सुद्धा जाणार आहेत. पण त्या दौऱ्याची तारीख अद्यापी ठरलेली नाही. राज ठाकरे आपल्या पक्षाला नव्यानं उभारी देण्याचा प्रयत्न करत आहेत.
आगामी निवडणुकांमध्ये मनसे आणि भाजपची युती होणार का? या प्रश्नावर बाळा नांदगावकर म्हणाले, एकला चलो यामधून आम्ही निवडणूका लढवल्या आहेत. मात्र तुर्तास तरी भाजपासोबत युतीबाबत कोणतीही चर्चा नाही. बाळा नांदगावकर यांनी ही प्रतिक्रिया दिल्यानंतर ‘तुम्हाला लवकरच चांगली बातमी मिळेल’ असे विधान केले आहे. त्यामुळे युती होण्याचे हे संकेत आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
अयोध्येतदेखील राज ठाकरे दौरा करणार आहे मात्र अद्याप अयोध्या दौराची तारीख ठरवले नाही. 16 डिसेंबरला पुण्यात पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नेते, निवडून आले माजी नगरसेवक तसेच आताचे नगरसेवक यांची सगळ्यांची बैठक आहे. आता दोन बैठकांची तारीख ठरलेली आहे. राज ठाकरे राज्यातील सहा विविध ठिकाणी बैठका घेणार आहेत. आता दोन ठिकाणीच्या तारखा ठरल्या आहेत. त्यानंतर राज ठाकरे कोकणात जातील. पण त्या दौऱ्याची तारीख अद्याप ठरलेली नाही, असंही बाळा नांदगावकर यांनी सांगितलंय.