श्रीपूर : नव्याने स्थापन झालेल्या महाळूंग-श्रीपूर नगरपंचायतीची पंचवार्षिक निवडणुक प्रक्रिया सुरू असून काल नामनिर्देशन पत्र भरण्याच्या शेवटच्या दिवस अखेर एकूण १३७ नामनिर्देशन पत्रे आलेली आहेत. यात २४ नामनिर्देशन पत्रे नागरिकांचा मागास प्रवर्गातील आहेत. या जागेची निवडणूक प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या आदेशामुळे स्थगित करण्यात आली आहे.
आज बुधवारी (८ डिसेंबर ) सकाळी ११ वाजता नामनिर्देशन पत्रांची छाननी झाली. एकूण १३७ पैकी १३ जागेसाठी ११३ नामनिर्देशन पत्रांची छाननी झाली. निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे नागरिकांचा मागास प्रवर्गातील जागेसाठी आलेल्या २४ नामनिर्देशन पत्रांची छाननी झाल्याची माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी धैर्यशिल जाधव यांनी दिली.
दरम्यान ही प्रथमच नगरपंचायतीची होणारी निवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपाने प्रतिष्ठेची बनविलेली असून त्याचबरोबर आघाडी पॅनल, शिवसेना , रिपाई, वंचीत यांच्यावतिने नामनिर्देशन पत्र भरण्याच्या शेवटच्या दिवशी शक्तिप्रदर्शन केले.
* कोणत्या प्रभागात कोणत्या जागेसाठी एकूण किती अर्ज पुढीलप्रमाणे
प्रभाग क्र.१ सर्वसाधारण (महिला) एकूण ६ नामनिर्देशन पत्रे, प्रभाग क्र.२ सर्वसाधारण एकूण १० नामनिर्देशन पत्रे, प्रभाग क्र.३ नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण ६ नामनिर्देशन पत्रे आली असली तरी देखील या प्रवर्गातील निवडणूक प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार स्थगित आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
प्रभाग क्र.४ अनुसूचीत जाती (महिला) एकूण ६ नामनिर्देशन पत्रे, प्रभाग क्र.५ अनुसूचीत जाती (महिला) एकूण ८ नामनिर्देशन पत्रे, प्रभाग क्र.६ सर्वसाधारण (महिला) एकूण ५ नामनिर्देशन पत्रे, प्रभाग क्र.७ नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण ७ नामनिर्देशन पत्रे आली असली तरी देखील या प्रवर्गातील निवडणूक प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार स्थगित आहे.
प्रभाग क्र.८ सर्वसाधारण एकूण ९ नामनिर्देशन पत्रे, प्रभाग क्र.९ सर्वसाधारण एकूण ११ नामनिर्देशन पत्रे, प्रभाग क्र.१० सर्वसाधारण (महिला) एकूण ६ नामनिर्देशन पत्रे, प्रभाग क्र.११ अनुसूचीत जाती एकूण १० नामनिर्देशन पत्रे, प्रभाग क्र.१२ सर्वसाधारण (महिला) एकूण ८ नामनिर्देशन पत्रे, प्रभाग क्र.१३ सर्वसाधारण एकूण ८ नामनिर्देशन पत्रे, प्रभाग क्र.१४ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) एकूण ५ नामनिर्देशन पत्रे आली असली तरी देखील या प्रवर्गातील निवडणूक प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार स्थगित आहे.
प्रभाग क्र.१५ नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण ६ नामनिर्देशन पत्रे आली असली तरी देखील या प्रवर्गातील निवडणूक प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार स्थगित आहे, प्रभाग क्र.१६ सर्वसाधारण (महिला) एकूण ११ नामनिर्देशन पत्रे, प्रभाग क्र.१७ अनुसूचीत जाती एकूण १५ नामनिर्देशन पत्रे.