मुंबई – महाराष्ट्रासाठी दिलासा देणारी बातमी आहे. डोंबिवलीत ओमिक्रॉनचा पहिला रूग्ण आढळला होता. हा रूग्ण राज्यातील पहिलाच रूग्ण होता. आता तो रुग्ण बरा झाला असून त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाची लागण झाल्याने त्याच्यावर उपचार सुरु होते. दरम्यान, रुग्णाला पुढचे ७ दिवस होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला रुग्णालयाने दिला आहे.
आफ्रिकन देशांत ओमिक्रॉन व्हेरिएंटने धुमाकूळ घातला आहे. त्यात कल्याण-डोंबिवलीमध्ये पहिला ओमिक्रॉनचा रुग्ण आढळून आला. ओमायक्रॉन व्हेरिएंटचा रुग्ण आढळून आल्याने राज्यात खळबळ उडाली होती. आता त्याच रुग्णाच्या बाबतीत दिलासादायक वृत्त समोर आले आहे. ओमायक्रोन बाधित रुग्ण बरा झाला आहे, त्याला रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. हा रुग्ण दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन शहरातून आला होता. रुग्ण बरा झाला असला तरी त्याला पुढील ७ दिवस होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
या रुग्णावर २७ नोव्हेंबर पासून केडीएमसीच्या कोव्हिड सेंटरमध्ये उपचार सुरु होते. त्याला कोणतीही लक्षण नसून त्याची प्रकृती स्थिर आहे. त्याचा आरटीपीसीआर अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला काल (बुधवार) रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ही माहिती महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. उर्वरित नायजेरियामधून आलेल्या त्या ४ कोरोनाबाधित रुग्णांच्या जीनोम सिक्वेन्सिंग अहवालाची अद्याप प्रतीक्षा असल्याचे डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.
महाराष्ट्रात आतापर्यंत ओमायक्रॉनचे दहा रुग्ण आढळले. राज्यात सध्या ६ हजार २८६ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्रात झालेल्या ६ कोटी ६३ लाख ८८ हजार ९०२ कोरोना चाचण्यांपैकी ६६ लाख ४० हजार ८८८ पॉझिटिव्ह आल्या. महाराष्ट्रात आतापर्यंत आढळलेल्या ६६ लाख ४० हजार ८८८ कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ८९ हजार ७२० जण बरे झाले. राज्यात १ लाख ४१ हजार २०४ कोरोना मृत्यूची नोंद झाली. तसेच ३६७८ कोरोना रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू झाल्याचे महाराष्ट्र शासन म्हणाले.
मागील २४ तासांत महाराष्ट्रात ८९३ नव्या कोरोना रुग्णांची आणि १० मृत्यूची नोंद झाली, याच कालावधीत राज्यातल्या कोरोना रुग्णांपैकी १०४० जण बरे झाले. राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट १० टक्के, रिकव्हरी रेट ९७.७२ टक्के आहे. कोरोनामुळे राज्यातील ७४ हजार १७० जण होम क्वारंटाइन तर ८९१ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.