मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकीचं पत्र देण्यात आलं आहे. हे पत्र अंत्यत अश्लिल भाषेत आहे, स्त्रियांच्या प्रत्येक अंगाचा उल्लेख आहे. घरच्यांना, मुलांना मारुन टाकू, अशी भाषा वापरण्यात आली आहे. पत्रामध्ये आत वेगळं नाव आहे. बाहेर वेगळं नाव आहे, असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं. माझ्या दादाकडे वाकड्या नजरेनं बघू नका, असा इशारा पत्रात देण्यात आला आहे.
काल गुरुवारी ( ता.९ ) संध्याकाळी हे पत्र महापौर बंगल्यावर हे पत्र पोहचले होते. या पत्राद्वारे महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. वृत्तानुसार माझ्या दादाकडे वाकड्या नजरेने बघू नका अशा आशयाचे पत्र महापौर यांना पाठवण्यात आले आहे.
पनवेलमधून कुरियरद्वारे हे पत्र पाठवण्यात आले आहे. पत्राच्यावर आणि पत्राच्या मजकुराखाली दोन वेगवेगळी नावे देण्यात आली आहेत. तसेच यामध्ये खारघर, पनवेल आणि उरण या ठिकाणांचा उल्लेख करण्यात आला आहे. यापूर्वी देखील महापौर किशोरी पेडणेकर यांनी धमकीचा कॉल आला होता. दरम्यान पोलिसांकडून या पत्राचा तपास सुरु आहे.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भाजप नेते आशिष शेलार यांच्यासोबतच्या वादानंतर महापौरांना धमकीचे पत्र मिळाले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या पत्रात अश्लील भाषेचा वापर करत महापौर किशोरी पेडणेकर यांना शिवीगाळ करण्यात आली आहे. या पत्राबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांनी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे.
महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, “इतर पत्र येतात त्यात हे पत्र होते. हे पत्र माझ्या जुन्या घराच्या पत्त्यावर आले. याच पत्ताही थोडा चुकलेला आहे. या पत्रात अतिशय अश्लील भाषेचा वापर करण्यात आला आहे. स्त्रियांच्या प्रत्येक अंगाचा उल्लेख आहे. घरच्यांना मारुन टाकू, मुलाला मारून टाकू.. उडवून टाकू अशी भाषा वापरली आहे. पत्रात आतमध्ये एकाचे नाव आहे आणि बाहेर वेगळं नाव आहे. आणि पोस्ट हे पनवेलचे आहे. पोलिसांत तक्रार दिली आहे.
कारण अशी हिंम्मत जर कोण करत असेल तर आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असेल. माझ्या पक्षाचा अजेंडा असतो. मी शिवसेना पक्षाची आहे. त्यामुळे धमकावून घरी बसवणे असं जर कोणाच्या मनात असेल तर होणारचं नाही पण दखल घेतली पाहिजे. कारण माथेफिरुंची संख्या कमी नाही.”
यावर बोलताना महापौर पुढे म्हणाल्या की, “आशिष शेलार आणि हा वाद वेगळा आहे. कोणत्या तरी पक्षाचा हा माथेफिरु असावा पण माथेफिरुचं असावा. कारण पत्रात कोण अशी घाण भाषा वापरु शकत नाही. लिहू शकत नाही. ती लिहिली गेली. कोणावरही संशय व्यक्त करु शकत नाही. पत्रात शिव्यांची लाखोली वाहिली आहे. स्त्रीच्या अंगाचे प्रदर्शन आहे. माझ्या दादाकडे बघितलं तर घरातल्यांना उडवून टाकेन, मुलाला मारुन टाकेन अशी भाषा वापरली आहे. कुटुंबाबद्दल लिहिल्याने मी थोडी धास्तावली. पोलीस सुरक्षा घेणार आहे.”
The following time I read a blog, I hope that it doesnt disappoint me as a lot as this one. I imply, I do know it was my option to learn, however I actually thought youd have something attention-grabbing to say. All I hear is a bunch of whining about something that you possibly can repair for those who werent too busy in search of attention.
The the next occasion I read a weblog, Lets hope so it doesnt disappoint me as much as this. I am talking about, I know it was my choice to read, but I personally thought youd have some thing intriguing to say. All I hear is a lot of whining about something you could fix if you werent too busy trying to find attention.