मुंबई : अभिनेत्री काम्या पंजाबी तिच्या सोशल मीडिया पोस्ट्समुळे कायम चर्चेत असते. नुकताच काम्यानं महिला सशक्ती करणाबाबत एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. त्यावर एका युजर्सने केलेल्या कमेंटवर काम्या पंजाबी चांगलीच भडकली. ट्रोलरला प्रत्युत्तर देत ती म्हणाली, मग काय? मला आनंदी राहाण्याचा किंवा जगण्याचा काहीच अधिकार नाही का? घटस्फोट झाला म्हणून महिलांनी मरायचं का? असं काम्या म्हणाली.
कहो ना प्यार है, यादे, फिर भी दिल है हिंदुस्थानी या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री काम्या पंजाबी सोशल मिडीयावर बरीच सक्रिय असते.
नुकताच तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर महिला सशक्तीकरण बाबत एक व्हिडिओ शेअर केला होता. यावर एका यूजरने कमेंट केली की, “आपले स्वतःचे लग्न वाचवू शकली नाहीस, घटस्फोट झाला. दुसरं लग्न केलंस. हे अतीच झालं. असं त्याने कमेंट केली हाेती.
त्यावर एका युजरनं केलेल्या कमेंटवर काम्या पंजाबी चांगलीच भडकली आहे. तिनं लागलीच तिथल्या तिथे संबंधित ट्रोलरला प्रत्युत्तर देत परखड शब्दांमध्ये सवाल केले आहेत. काम्या पंजाबीला तिच्या पहिल्या लग्नावरून खोचक शब्दांत चिडवणाऱ्या या कमेंटवर काम्यानं लगेच प्रत्युत्तर दिलं आहे. तिचं हेच उत्तर आता चर्चेत आलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
काम्या पंजाबीने दिलेले उत्तर अतिशय योग्यच आहे. घटस्फोट झालेली स्त्री असो किंवा सिंगल वुमन असो बरेच पुरुष तिच्याकडे एक अव्हेलेबल ऑप्शन म्हणून बघतात वर तिच्या बद्दल वाईट बोलायलाही मागे पुढे पाहत नाहीत. ही मानसिकता त्यांचा प्रॉब्लेम असला तरी त्यांना ह्याची जाणीव नसते. ही वाईट गोष्ट आहे.
ट्रोलर्सविषयी काम्या म्हणाली होती, “मी सोशल मीडियावर ट्रोल होते आहे. लोकं म्हणतायत की आमच्या कुटुंबात विभक्त होणं, घटस्फोट होणं असं काही घडत नाही. पण घटस्फोट हा फार वेदनादायी शब्द आहे. देव करो आणि असं काही कुणासोबतही न घडो. आपला समाज हा शब्द एखाद्या शिवीसारखा वापरतो. जर कुणाचा घटस्फोट झाला, कुणाला नव्यानं आयुष्य सुरू करायचं असेल, कुणी सिंगल पॅरेंट असेल तर त्यांना ट्रोल केलं जातं. लोक त्यांना पाठिंबा देत नाहीत”, असं काम्या म्हणाली होती.
काम्यानं तिथेच या युजरच्या कमेंटवर प्रतिक्रिया दिली. “मग काय? मला आनंदी राहाण्याचा किंवा जगण्याचा काहीच अधिकार नाही का? घटस्फोट झाला म्हणून महिलांनी मरायचं का? घटस्फोटामुळे एखाद्या महिलेचं आयुष्य संपून जातं का? तुमच्यासारखा विचार करणाऱ्या लोकांविरोधात प्रत्येक महिलेनं आवाज उठवायला हवा आणि त्या तसं करतही आहेत. मला कमजोर समजू नका. मी मुलगी आहे, लढू शकते”, असं काम्या म्हणाली आहे.
काम्या पंजाबीचं २००३ मध्ये बंटी नेगीसोबत लग्न झालं होतं. २०१३ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यांना आरा नावाची एक मुलगी देखील आहे. घटस्फोटानंतर सात वर्षांनी म्हणजे गेल्या वर्षी काम्यानं शलभ दंगसोबत दुसरं लग्न केलं. तेव्हा देखील काम्या पंजाबीवर दुसऱ्या लग्नामुळे बरंच ट्रोलिंग झालं होतं.