नवी दिल्ली : भारतावर सध्या कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉनचे सावट आहे. ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने 31 जानेवारीपर्यंत 2022 पर्यंत नियमित आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
यापूर्वी ही उड्डाणे 15 डिसेंबरपासून सुरु होणार होती. दरम्यान, काही देशांतील कोरोनाची परिस्थिती पाहून उड्डाणांबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालकांनी (DGCA) जारी केलेल्या पत्रात ही माहिती देण्यात आली आहे. कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षी 23 मार्चपासून देशात आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवा बंद करण्यात आली आहे.
कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनेही सुधारित गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. सुधारित गाईडलाईन्सनुसार, संसर्गाचा धोका असणाऱ्या देशातून आलेल्या आणि लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाही विमानतळावर कोरोना टेस्ट करणे अनिर्वाय असणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
देशातील कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यामुळे सरकारने 15 डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन आढळून आल्यामुळे आणि भविष्यातील संभव्य धोका लक्षात घेता आंतरराष्ट्रीय विमान सेवा 31 जानेवारी 2022 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अनेक देशांमध्ये ओमिक्रॉनचे रूग्ण आढळून आल्यानंतर अनेक राजकारण्यांनी पंतप्रधान मोदींकडे धोकादायक असणाऱ्या देशांतून देशात येणाऱ्या विमानांच्या उड्डाणांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
इंटरनॅशनल कार्गो संचालन आणि डीजीसीएद्वारे परवानगी दिलेल्या विमानसेवेवर हे लागू होणार नाही. त्याबरोबरच डीसीजीएने सांगितले की, आंतरराष्ट्रीय विमानसेवेतील अधिकाऱ्यांना काही मार्गांसाठी परवानगी देण्याची अनुमती देण्यात आली आहे.