मेक्सिको : दक्षिण मेक्सिकोत ट्रक उलटून 49 जणांचा मृत्यू झाला असून, 10 हून अधिक जण जखमी झाले आहेत. स्थानिक प्रशासनानं या अपघाताबद्दल ही माहिती दिली. या अपघातानंतर रस्त्यावर सर्वत्र मृतदेह पसरले होते. हा अपघात झाला, त्यावेळी जवळपास 100 स्थलांतरित लोक ट्रकमध्ये होते. हे लोक मध्य अमेरिकेतील होते.
स्थानिक प्रशासनानं या अपघाताबद्दल ही माहिती दिली. चियापासजवळील ब्रिजजवळ ज्यावेळी हा अपघात झाला, त्यावेळी जवळपास 100 स्थलांतरित लोक ट्रकमध्ये होते. अमेरिकेतील स्थलांतरित असल्याचं माहिती समोर आली आहे. मात्र त्यांच्या राष्ट्रीयत्वाची अद्याप पुष्टी झाली नाही. चियापास राज्य नागरी संरक्षण कार्यालयाचे प्रमुख लुईस मॅन्युएल मोरेनो यांनी सांगितले की, वाचलेल्यांपैकी काहींनी सांगितले की ते शेजारच्या ग्वाटेमालाचे आहेत.
हे लोक मध्य अमेरिकेतील होते. या अपघातानंतर रस्त्यावर सर्वत्र मृतदेह पसरले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अपघातातील दुखापत झालेल्या जवळपास 58 जणांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आल्याची माहिती चियापस सिव्हिल प्रोटेक्शन एजन्सीचे लुईस मॅन्यएल ग्रासिया यांनी दिली. त्यांच्या माहितीनुसार, या अपघतात प्रौढ स्त्री-पुरुषांसह लहान मुलंही होती.
या ट्रकमधील लोक होंडुरासमधील स्थलांतिरत होते, अशी माहिती अग्निशमन दलाच्या प्रमुखाने रॉयटर्स न्यूज एजन्सीला दिली. स्थलांतरितांना वाहून नेणारा हा ट्रक वळणावर घसरला आणि चियापास राज्याची राजधानी टक्स्टला गुटेरेझकडे जाणाऱ्या रस्त्यारील फूटपाथवर जाऊन धडकला.
कागदपत्र नसलेल्या स्थलांतरितांचं सर्वात मोठं ट्रान्झिट पॉईंट म्हणून चियापासची ओळख आहे.
मध्य अमेरिकेतील गरिबी आणि हिंसेला कंटाळून शेकडो लोक दरवर्षी मेक्सिकोमार्गे स्थलांतर करत अमेरिकेत पोहोचतात. अनेकजण स्मगलर्सना पैसे देऊन स्थलांतर करतात.
मात्र, एकाच वाहनात अनेकांना कोंबून असे वाहून नेले जाते, जे अत्यंत धोकादायक ठरतं. मेक्सिकोचे अध्यक्ष अँड्रेझ मॅन्युएल लोपेझ ओब्रॅडर यांनी या दुर्घटनेबाबत म्हटलं की, अत्यंत वेदनादायी घटना आहे. तसंच, या घटनेबद्दल अत्यंत वाईट वाटतंय, असंही त्यांनी ट्विटरवर लिहिलंय.