उस्मानाबाद : मुंबई आणि उपनगरांची चिंता वाढवल्यानंतर आता ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या रुग्णांची मराठवाडा आणि विदर्भात झपाट्याने वाढ होत आहेत. राज्यात ओमिक्रॉनचे आज नवे रुग्ण उस्मानाबाद आणि बुलडाणा जिल्ह्यात आढळून आले आहेत. सोलापूरच्या शेजारील जिल्ह्यात ओमिक्रॉनने शिरकाव केल्याने सोलापूरच्या चिंतेत भर पडली आहे.
आता मराठावाडा आणि विदर्भाची चिंताही वाढली आहे. मराठवाडा आणि विदर्भातले निर्बंध आणखी कडक होण्याची शक्यता आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली. दुबईवरून बुलडाण्यात आलेल्या 55 वर्षीय व्यक्तीला कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटची बाधा झाल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात पहिला ओमिक्रॉनच्या रुग्णाची नोंद झाली आहे.
राज्यात तीन नवे ओमिक्रॉन रुग्ण आढळून आल्याने आता ओमिक्रॉनबाधितांची संख्या 31 वर पोहोचली आहे. काल ही संख्या 28 वर होती, काल एकाच दिवसात 8 रुग्णांची भर पडली होती. त्यामुळे राज्याची चिंता वाढली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आता ओमिक्रॉनचा उस्मानाबाद जिल्ह्यात प्रवेश झाला आहे. उस्मानाबादेत 2 रुग्ण आढळून आले आहेत. यूएईहून बावी येथे आलेला रुग्ण ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आल्याने खळबळ पसरली आहे. त्यामुळेच बावीत कलम 144 लागू करण्यात आले असून गावात 5 रुग्ण आहेत, त्यापैकी दोन जणांचे अहवाल ओमिक्रॉनबाधित आले आहेत, तर इतरांचे अहवाल अजून प्रतिक्षेत आहेत. तर बुलडाण्यातही एक रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे विदर्भाची चिंताही वाढली आहे. त्यामुळे विदर्भातही नियम कडक केले जाण्याची शक्यता आहे.
राज्यात आज एकूण 4 नवीन रुग्ण आढळले आहे. राज्यात ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 32 वर पोहोचली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात ओमायक्रॉनने शिरकाव केला आहे.
युएईहुन बावी येथे आलेला रुग्ण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे बावीत कलम 144 लागू करण्यात आले आहे. शारजा,युएई (संयुक्त अरब अमिरात) हून उस्मानाबाद जिल्ह्यात आलेला 42 वर्षीय पुरुष रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. पण त्याच्या संपर्कात आलेल्या रुग्णाचा ओमायक्रॉन अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
सायबेरियामध्ये आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद! WMO चा जगाला इशारा उस्मानाबाद आरोग्य विभागाने 5 नमुने ओमायक्रॉन चाचणीसाठी पाठविले होते त्यापैकी 2 अहवाल ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आले आहे. बावी येथील तरुण व त्याच्या घरातील एकजण पॉझिटिव्ह आढळला आहे. बावी येथील या तरुणाच्या संपर्कातील आणखी काही जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत, मात्र त्यांचा ओमायक्रॉन अहवाल येणे अद्याप बाकी आहे.