मुंबई : व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून राजकीय नेत्याला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न झाल्याचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. अश्लील व्हिडिओ कॉल करुन ब्लॅकमेल केले जात असल्याचा आरोप सुर्वेंनी केला आहे. सुर्वे हे मुंबईतील मागठाणे विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत.
आमदार प्रकाश सुर्वे यांनी दहिसर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. आमदार प्रकाश सुर्वे हे मुंबईतील मागाठाणे विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. अश्लील व्हिडीओ कॉल करुन ब्लॅकमेल केले जात असल्याचा आरोप प्रकाश सुर्वेंनी केला आहे. अज्ञात महिलेने अश्लील व्हिडीओ कॉल करून पैशांची मागणी केलीय.
आमदार प्रकाश सुर्वे यांना 13 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास नमस्ते असा व्हॉट्सॲप मेसेज आला. एका अज्ञात क्रमांकावरुन सुर्वेंना हा मेसेज आला होता, परंतु सुरुवातीला प्रकाश सुर्वे यांनी उत्तर दिले नाही. 16 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास प्रकाश सुर्वे यांना त्याच नंबरवरून आणखी एक व्हॉट्सअॅपवर मेसेज आला, ज्यामध्ये ‘नमस्कार काय झाले? असे विचारण्यात आले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
नंतर काही वेळातच प्रकाश सुर्वे यांना व्हिडीओ कॉल आला. प्रकाश सुर्वे यांनी पोलिसांना सांगितले की, सुरुवातीला आपण फोन उचलला नाही, मात्र दुसऱ्यांदा फोन आल्यावर एखादी व्यक्ती अडचणीत असेल, असा विचार करुन त्यांनी फोन उचलला. व्हिडीओ कॉलवर एक महिला अश्लील कृत्य करत होती, काय होत आहे हे लक्षात येताच त्यांनी फोन डिस्कनेक्ट केला, त्यानंतरही आपल्याला त्या नंबरवरून वारंवार कॉल येत होते, असं सुर्वे म्हणाले.
दरम्यान, सुर्वे यांनी मला फोन करू नका अन्यथा पोलिसात तक्रार करू, असे सांगितले. या प्रकरणी दहिसर पोलीस अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
* नेमका कसा घडला प्रकार
महिला आपले कपडे काढून त्यांच्यासमोरच अश्लील हावभाव करू लागली. त्यामुळे प्रकाश सुर्वे यांनी तो कॉल बंद केला होता. त्यानंतर त्यांनी प्लीज डोन्ट कॉल मी, अदरव्हाईस आय विल कम्प्लेंट टू पोलीस स्टेशन असा मॅसेज पाठवला होता. यावेळी या महिलेने त्यांच्या व्हिडीओ कॉल मॉर्फ करून त्याचा एक व्हिडीओ तयार करून त्यांना पाठवून त्यांच्याकडे पाच हजार रुपयांची मागणी केली होती.