अक्कलकोट : अक्कलकोट शहरातील गरजू, वृद्ध, दिव्यांग, निराधार लोक आहेत, ज्यांची रोजच्या जेवणाची भ्रांत आहे. त्या निराधार लोकांसाठी आजपासून श्री दत्तजयंतीपासून ‘समर्थ महाप्रसाद’ सेवेस प्रारंभ केला आहे.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या संकल्पनेतून दोन्ही वेळचे जेवण डब्यातून पुरविण्याचा निर्णय घेतले आहे. आज दत्त जयंतीच्या दिवशी स्वामी भक्तांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. आज शनिवारी 63 जणांना घरपोच डबा देण्यात आले.
दरम्यान अन्नछत्र मंडळातील महाप्रसादालयात श्रींच्या महापूजनानंतर श्री अन्नपूर्णा देवीचे पूजन व महाप्रसादाचे पूजन स्वामी भक्तांच्या हस्ते करून “समर्थ महाप्रसाद” सेवेला प्रारंभ केला.
गेली 33 वर्षे अविरतपणे अन्नदानाचे स्वामीकार्य करणारे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे न्यास संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे.
अन्नछत्र मंडळात दररोज 15 ते 20 हजार भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात. कोरोनाचे पार्श्वभूमीवर दोन्ही लॉकडाऊन कालावधीत सामाजिक बांधिलकी जपत ह्या न्यासाने शहर व ग्रामीण भागात सलग 8 व 7 महिने अन्नदान सेवा केली आहे.
* यांना मिळणार लाभ
किमान वय 50 वर्ष पूर्ण असावे , दिव्यांगाना वयोमर्यादेमध्ये शिथिलता असेल. व्यसनाधीन व्यक्तींचा विचार केला जाणार नाही. अर्ज करणारी व्यक्ती कुठलेही काम करण्यास सक्षम नसावी.
अर्ज करणार्या व्यक्तीच्या घरामध्ये कुणीही कमावता नसावा.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अर्जदाराने फॉर्म भरून देताना पुढील कागदपत्रे जोडावी. रेशनकार्ड / आधारकार्ड झेरॉक्स प्रत
कमीत कमी एक महिन्यापूर्वीचे 3 आय.डी. साईज फोटो. अर्जावरती अर्जदाराची सही किंवा अंगठा
अर्जास कोणी शिफारस केले असेल तर शिफारस कर्त्याचे पूर्ण नाव व मोबाईल नंबर नमूद करावा.
* सायंकाळपर्यंत 175 जणांचे रक्तदान
दोन्ही वेळच्या 70 हजारहून अधिक भाविकांनी आज महाप्रसादाचा लाभ घेतला. महाप्रसाद, यात्रीनिवास, यात्रीभूवन यासह विविध उपक्रम हे लाखो स्वामी भक्तांच्या सेवेत सज्ज आहेत. या श्री दत्त जयंतीच्या दिवशी राज्यातील विविध भागातून दिंडी व पालख्या श्रीक्षेत्र अक्कलकोटमध्ये दाखल झाल्या. या सर्व स्वामी भक्तांकरिता देखील सोय केली.
न्यासाने कोरोना ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर स्वामी भक्तांना महाप्रसादाची सोय सुलभतेने होण्याकरिता भाविकांना टप्या-टप्प्याने शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करीत महाप्रसादास सोडण्यात आले. नियमांचे पालन म्हणून न्यासात प्रवेश करणार्या स्वामीभक्तांना सॅनिटायझर, मास्क वापरणे, सामाजिक अंतर सक्तीचे करण्यात आले होते.
श्री दत्त जयंतीनिमित्त अन्नछत्र मंडळ न्यास व सोलापूर येथील श्री बसवेश्वर, अक्षय, अश्विनी, रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरास स्वामीभक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला असून सायंकाळपर्यंत 175 जणांनी रक्तदान केले. स्वामी भक्तांना महाप्रसादाचा लाभ सुलभतेने होण्याकरिता प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली टीम अन्नछत्र सतर्कतेने कार्यरत होती.
अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या