पुणे : राज्यातील ठाकरे सरकारने पेट्रोल स्वस्त करायचं सोडून दारु स्वस्त केली. उद्धव ठाकरे सरकारने पेट्रोल-डिझेल का स्वस्त केले नाही. देशभरातील राज्याने पेट्रोल-डिझेलवरील कर कमी केले. पण महाविकास आघाडी सरकारने दारुवरील कर कमी केला, असा आरोप गृहमंत्री अमित शाह यांनी केला. ते पुण्यात बोलत होते.
पुणे महापालिकेवर भाजपचा झेंडा कायम राहणार असल्याचा दावाही केलाय. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवस पुणे दौऱ्यावर आहेत.
सायंकाळी त्यांनी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांना कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्श केले. गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यात बोलताना ठाकरे सरकारला आव्हान दिलं आहे. सत्तेतून पायउतार व्हा आणि मग मैदानात उतरुन दोन दोन हात करु. जनता कुणाला कौल देते हे पाहूयात, तिन्ही पक्षाने एकत्र लढून भाजपला हरवून दाखवावे, असं शाह यांनी म्हटलं. तसेच मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेनं हिंदुत्व बाजूला ठेवलं आहे. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून 2019 मध्ये भाजपसोबत विश्वासघात केला, असंही ते म्हणाले.
अमित शहा म्हणाले, “महाराष्ट्राच्या निवडणुकीसाठी मी २०१९ मध्ये आलो होतो. त्यावेळी शिवसेनेसोबत जी चर्चा झाली, मी स्वत: केलेली आहे. मी पुन्हा आज सांगू इच्छितो त्यावेळी ठरलं होतं देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात निवडणूक लढली जाईल आणि मुख्यमंत्री भाजपाचा होईल. मात्र ते बदलले, सत्तेसाठी हिंदुत्वाशी समझोता केला. दोन पिढ्यांपासून ज्यांच्याशी लढत होते, त्यांच्या मांडीवर जाऊन बसले आणि म्हणतात आम्ही तर असं म्हणालोच नाही.”
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ते सांगतात की मी खोटं बोलतोय. चला एका सेकंदासाठी मान्य करू, पण तुमच्या सभेच्या पाठीमागे जे बॅनर लागत होते ना, त्यात तुमच्या फोटोची आणि मोदींच्या फोटोची साईज जरा बघा. तुमचा फोटो एक चतुर्थांश होता. प्रत्येक भाषणात तुम्हाला मोदींचं नाव घ्यावं लागत होतं. तुमच्याच उपस्थितीत मी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोघांनी म्हटलं होतं की, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात निवडणूक लढली आहे आणि एनडीए विजयी झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री बनतील. मात्र तुम्हाला तर मुख्यमंत्री बनायचं होतं, तुम्ही आमच्यासोबत विश्वासघात केला आणि सत्तेवर बसलात.” असंही अमित शहा यांनी बोलून दाखवलं.
महाराष्ट्राचे महाविकासआघाडी सरकार अशाप्रकारचं सरकार आहे की जी अशी तीनचाकी रिक्षा आहे, जिचे चाक वेगवेगळ्या दिशेला जात आहे. मात्र माझी थोडी चूक झाली. मी खूप आशावादीपणे या सरकारबद्दल विचार केला. आज मी यामध्ये थोडा बदल करू इच्छितो. महाराष्ट्राचे महाविकासआघाडी सरकार तीन चाकी ऑटो रिक्षा आहे, ज्याची तिन्ही चाक वेगवेगळ्या दिशेला आहेत आणि तिन्ही चाकं पंक्चर आहेत जे चालतच नाहीत. केवळ धूर बाहेर सोडते आणि प्रदूषण करते.” अशा शब्दांमध्ये अमित शहा यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.
अमित शहा म्हणाले की, “महाराष्ट्रातील जनतेकडे तुम्हाला जावं लागेल, घराघरात जावं लागेल आणि विचारावं लागेल की हे सरकार महाराष्ट्राचं कल्याण करू शकते का? जो महाराष्ट्र स्वातंत्र्यानंतर कित्येक वर्षे प्रत्येक क्षेत्रात अग्रस्थानी राहिला. देशाचं नेतृत्व केलं. सहकार चळवळ असो, उद्योग क्षेत्रात गुंतवणूक, निर्यात, प्रत्यक्ष कर वसुली, कृषी उत्पादन, दुग्ध उत्पादन, महाराष्ट्राने अनेक वर्ष देशाचं नेतृत्व केलं आहे. ही लोक महाराष्ट्राला जुनं वैभव प्राप्त करून देऊ शकतात का?” तसेच, ” हे बिनकामाचं सरकार आहे आणि या सरकारच्या पडझडीची सुरूवात पुणे महापालिकेच्या निवडणूक निकालापासून झाली पाहिजे.” असंही यावेळी अमित शहा यांनी म्हटलंय.
I am not really superb with English but I line up this very easy to understand .
Loving the info on this internet site , you have done outstanding job on the articles .
Wait a minute? Why is it only showing my views? :O
806447 131651You can surely see your enthusiasm in the function you write. The world hopes for a lot more passionate writers like you who arent afraid to say how they believe. Always go after your heart. 904689